Download App

Amitabh Bachchan यांना दुखापत, हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान घडली घटना

हैदराबाद : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जखमी हे एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अ‍ॅक्शन सीनचं शूटिंग करत होते.

या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडिने मुंबईला पाठवण्यात आले आहे. आता ते आपल्या घरी आराम घेत आहेत.

अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित

हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान आपण जखमी झाल्याची माहिती अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वतः दिली. त्यांनी ब्लॉगवरून ही माहिती दिली. त्यांनी यामध्ये लिहीले की, ‘बरगडीच्या स्नायू फाटला आहे. शूटिंग रद्द करण्यात आले आहे. त्यावर प्रथमोपचार करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खूप त्रास होतोय. हालचाल करण्यात अडचण येते. श्वास घेण्यासही त्रास होतो. मला या दुखण्यावर काही औषधे दिली आहेत. बरे होण्यासाठी काही आठवडे लागतील.’ असं ते म्हणाले. आता चाहत्यांकडून अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

या अगोदर देखील कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तो जखमी झालो होते. त्यावेळी देखील अॅक्शन सीनचं शूटिंग करताना जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा ते दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना जखमी झाले आहेत.

Tags

follow us