Download App

Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary लेकीची आणि नातीची खास पोस्ट…

  • Written By: Last Updated:

Amitabh And Jaya Bachchan 50th Anniversary: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सर्व चाहत्यांचे बिग बी आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा आज लग्नाचा 50 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं अनेक जण सोशल मीडियावर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत. बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या श्वेता बच्चन आणि नात नव्या यांनी (Social media post ) सोशल मीडियावर खास पोस्ट केले आहेत.

श्वेता बच्चननं बिग बी’ आणि जया बच्चन यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोला तिने ‘हॅप्पी 50, आता तुम्ही “गोल्डन” आहात. एकदा माझ्या आईला विचारण्यात आले होते की, सुखी संसाराचं सिक्रेट काय असते? तेव्हा तिनं उत्तर दिले, प्रेम. मला वाटतं की, माझे वडील हे पत्नी नेहमीच बरोबर असते, असा विचार करतात, असे तिने यावेळी कॅप्शन लिहिले आहे.


श्वेताची मुलगी नव्याने देखील सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एका सिनेमाच्या सेटवर असलेला फोटो शेअर केला आहे. तसेच बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ’50 वर्ष झाली आहेत. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आदर याबद्दल मी तुमचे आभार मानतो. खरेतर 1973 मध्ये जया बच्चन आणि बिग बी यांनी लग्नगाठ बांधली होती.

सिलसिला, अभिमान, बन्सी बिरजू, कभी खुशी कभी गम या सिनेमामध्ये बिग बी आणि जया बच्चन यांनी काम केले आहे. बिग बी आणि जया बच्चन यांच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असायचे. तसेच बिग बींचे हे प्रोजेक्ट- के या सिनेमामधून चाहत्यांना भेटीला येणार आहेत.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

या सिनेमात बिग बी यांच्याबरोबर दीपिका पादुकोण आणि प्रभास हे देखील महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच जया बच्चन यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा देखील 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात जया बच्चन यांच्याबरोबर आलिया भट्ट आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Tags

follow us