Download App

Amitabh Bachchan यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची जलसाबाहेर गर्दी, Video Viral

  • Written By: Last Updated:

Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील (Bollywood) महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी हे त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमी मनं जिंकत असतात. एग्री यंग मॅन, बिग बी (Big B) असंही बच्चन याची ओळख आहे. बिग बी यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेकवेळा बिग बींची एक झलक बघण्यासाठी चाहते त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.


नुकताच बिग बी यांनी एक खास व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. या व्हिडीओत असे दिसून येत आहे की, बिग बी यांना बघण्यासाठी ‘जलसा’ या बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. बिग बी (Amitabh Bachchan) यांनी चाहत्यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत असे दिसून येत आहे की, जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यानंतर बंगल्याचे गेट उघडन्यात आले आहे, आणि तिथे बिग बी हे स्वतः आल्याचे दिसून येत आहे.

बिग बींना बघून चाहते देखील मोठ्या प्रमाणात खुश झाले आहेत. या व्हिडीओला बिग बी यांनी कॅप्शन दिले आहे,’जे येतात त्यांच्यासाठी अनंत प्रेम.. मी आज जे आहे, ते त्यांच्यामुळेच आहे. असे बिग बी यांनी यावेळी म्हणाले आहेत. बिग बी यांच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच त्यांचा प्रोजेक्ट के हा सिनेमा चाहत्यांना बघायला मिळणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत बिग बी यांनी ‘प्रोजेक्ट के’ असं लिहिलेली हुडी परिधान केल्याचे दिसत आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

बिग बी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘प्रोजेक्ट के’ या आगामी सिनेमात बिग बी (Amitabh Bachchan) यांच्याबरोबर प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिकेत दिसून येणार आहेत. केबीसी सारख्या कार्यक्रमांबरोबर बिग बी यांनी वेगवेगळ्या सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीला येत असतात. गेल्या काही दिवसापासून त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे सिनेमे रिलीज झाले आहेत. तसेच बिग बी यांचा ऊंचाई हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

Tags

follow us