Download App

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओवर थेट ‘बिग बीं यांना सुद्धा राग अनावर!

Rashmika Mandanna Fake Video: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social media) अनेक सेलिब्रिटींचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ लीक होत आहेत. आता पुष्पा स्टार रश्मिका मंदान्नाचा असाच एक बोल्ड व्हिडिओ (bold video) सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यावर आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabha Bachchan) म्हणजेच ‘बिग बीं यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून अशा कृतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने लिहिले आहे की, ‘तुम्हाला सांगताना खूप दुःख होत आहे की, सोशल मीडियावर माझा एक बनावट व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोक तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. ही केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी खूप भीतीदायक गोष्ट असणार आहे.

रश्मिका पुढे लिहिले आहे की, ‘आज मी माझे सर्व कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे मला समर्थन केल्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छिते. पण हा प्रकार माझ्यासोबत शाळा-कॉलेजात घडला असता, तर मी काय केले असते, हे मला माहीत नाही? त्यामुळे आपण सर्वांनी याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.

Sonu Sood: ‘मै भी सोनू सूद’च्या चाहत्यांची भारतभर खास मोहीम; तब्बल 6645 किमीचा प्रवास करणार

त्याचवेळी बॉलिवूड स्टार अभिताभ बच्चनही रश्मिकाला सपोर्ट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना बिग बींनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की “होय, या अशा व्हिडिओवर कायदेशीररित्या कारवाई होऊ शकते.या क्लिपमध्ये, अभिनेत्री काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट ड्रेसमध्ये लिफ्टच्या आत जाताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये ती रश्मिका नसून झारा पटेल आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. परंतु यावर चाहते सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत.

follow us

वेब स्टोरीज