Download App

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

Amol Kolhe On Gutami Patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे.

Gautami Patil च्या कार्यक्रमाला अजितदादा येणार? …म्हणून चर्चांना आले उधाण

या प्रकरणात तिच्या समर्थनार्थ अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील तिला आडनाव बदलायाला लावणाऱ्यांचा तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, ‘तिने लावणी नृत्यांगणा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आज तिची क्रेझ आहे. कला क्षेत्रात हे कायमस्वरूपी नसतं. आज जे तिच्याबाबतीत घडतय ते प्रत्येक कलाकारासोबत घडतं.’

Gautami Patil : “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”; संभाजीराजे छत्रपतींचा 24 तासांच्या आत युृ-टर्न;

‘आज त्या शिखरावर गौतमी आहे. अशा वेळी तिला ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबना होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच सध्या जरी तिच्या कार्यक्रमाला गर्दी होत असली तरी जेव्हा तिची परिस्थिती हालाखीची होती. तेव्हा तिला दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं. आता ती तिच्या कर्तृत्वावर पुढे जात आहे तर कुणाच्या पोटात दुखायचं काय कारण.’ अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी गौतमीनर टीका करणाऱ्यांना खडसावलं आहे.

Anupam Mittal Father Death: शार्क टॅंक फेम अनुपम मित्तल यांच्या वडिलांचं निधन

दरम्यान या अगोदर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘महिलांनी आपले गुण व कृतृत्व दाखवायालव पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. तसेच पाटील हे आडनाव मराठा समाजातच नाही तर अनेक समाजामध्ये लावले जाते. ते आडनाव नसून तो एक किताब आहे. त्यामुळे तो अनेक समाजाला मिलालेला असलेल्याने ते आडनाव म्हणून लावले जाते. त्यामुळे कालाकारांना सुरक्षा मिळाली पाहिजे.’ असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं.

Tags

follow us