Gautami Patil च्या कार्यक्रमाला अजितदादा येणार? …म्हणून चर्चांना आले उधाण

Untitled Design 2023 04 25T184736.580

Ajit Pawar will Attend Gautami Patils programme : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अनेक वादांमध्ये देखील सापडत आहे. तसेच अनेकदा तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात देखील आला. स्वतः अजित पवारांनी देखील तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला होता.

संसद भवनाच्या वादात अजितदादांचा वेगळाच सूर; म्हणाले, शेवटी आम्हाला एक छान…

मात्र आता गौतमीच्या कार्यक्रमाला अजित पवार हजेरी लावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य जल्लोष’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे याच खेड तालुक्यातील मोई येथे नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आहे. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमाला अजित पवार हजेरी लावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Anupam Mittal Father Death: शार्क टॅंक फेम अनुपम मित्तल यांच्या वडिलांचं निधन

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीला अजित पवारांनी खडसावले होते. त्यानंतर तिने त्यांची दिलगिरी देखील व्यक्त केली होती. तसेच त्यानंतर गौतमीने बैला पुढे डान्स केल्यानंतर देखील अजितदादांनी मिश्किल टीपण्णी केली होती. त्यामुळे आता गौतमीच्या कार्यक्रमाला अजित पवार हजेरी लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

यापूर्वी आमदार अजित पवार यांनी गौतमीच्या नृत्यावरून तिच्यावर टीका केली होती. त्यानंतर देखील पुन्हा एकदा पवार एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना यात्रेचा विषय निघाला. तर यावर बोलताना अजित पवार म्हणाले, यात्रेत तमाशात त्या पाटीलबाईंना बोलवायचं. कोण ती? गौतमी… असे म्हंटल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुढे बोलताना पवार म्हणाले, लोकांना, सगळ्यांना पाहता येईल असे काम सगळ्यांनी करावे, असा सल्ला यावेळी पवार यांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिला दिला होता.

Tags

follow us