संसद भवनाच्या वादात अजितदादांचा वेगळाच सूर; म्हणाले, शेवटी आम्हाला एक छान…

संसद भवनाच्या वादात अजितदादांचा वेगळाच सूर; म्हणाले, शेवटी आम्हाला एक छान…

Ajit Pawar on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून मोठा गदारोळ उठला होता. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होती. उद्घाटनानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तर अत्यंत खोचक टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र वेगळा सूर आळवला आहे.

नव्या संसद भवनात सर्वांनी संविधानानुसार काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. जुनी संसद ब्रिटिशांनी बांधली होती. अनेक राज्यांनी स्वतःच्या विधानसभा इमारती बांधल्या आहेत. राज्यातही विधानसभेची नवी इमारत असावी अशी चर्चा सुरू आहे.

‘संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा इव्हेंट करू नका; सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

संसदेची इमारत बांधली तेव्हा देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. आता 135 कोटींचा आकडा पार झाला आहे. लोकप्रतिनिधी वाढले आहेत. मला वाटते, या नवीन इमारतीची गरज होती. कोरोनाच्या काळात विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण केले आणि शेवटी आम्हाला एक छान संसद भवन मिळाले असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, काही वेळ मी हा कार्यक्रम पाहिला. मी या कार्यक्रमाला गेलो नाही हे बरं झालं. तिथे धार्मिक कार्यक्रम केले गेले. यामुळे पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या आधुनिक भारताच्या संकल्पनेस धक्का बसत आहे. हा प्रकार चिंताजनक आहे.

ऑडियो क्लिप व्हायरल झाली अन् धानोकरांचं तिकीट डिक्लेअर झालं… 2019 मध्ये काय घडलं होतं?

खासदार सुप्रिया सुळे यांनीही या कार्यक्रमावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. सुळे म्हणाल्या, संसद भवन हे लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. त्या संसद भवनाचा इव्हेंट करू नका. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असावेत. सर्वांच्या समन्वयाने देश चालतो. गेल्या नऊ वर्षात असं अनेकदा झालं आहे की सरकारमधले महत्वाचे मंत्री त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी फोन केले आहेत. चर्चा त्यांच्या सोयीप्रमाणे, विरोधी पक्ष त्यांनी सोयीप्रमाणे हवा असतो. हे दुर्दैवी असून लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube