‘संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा इव्हेंट करू नका; सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

‘संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा इव्हेंट करू नका; सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Supriya Sule Criticized Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाच्या इमारतीचा उद्घाटन (New Parliament Building Inauguration) समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मोदी यांच्या हस्ते सेंगोल संसद भवनात स्थापित करण्यात आला. देशातील विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाचा विरोध करत बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आता नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सुळे म्हणाल्या, संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही, असं म्हणत निशाणा साधला आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असावेत. सर्वांच्या समन्वयाने देश चालतो. गेल्या नऊ वर्षात असं अनेकदा झालं आहे की सरकारमधले महत्वाचे मंत्री त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी फोन केले आहेत. चर्चा त्यांच्या सोयीप्रमाणे, विरोधी पक्ष त्यांनी सोयीप्रमाणे हवा असतो. हे दुर्दैवी असून लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

‘… तर कधी कधी माघार घ्यावी लागते’, अहिल्यादेवींच्या जयंतीचा वाद टोकाला

दरम्यान, आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही (Lok Sabha Speaker Om Birla)उपस्थित होते. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी, पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसद भवनात महात्मा गांधींना (Mahatma Gandhi)पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड दिला. राजदंड हातात घेण्याआधी पीएम मोदींनी सेंगोलसमोर साष्टांग दंडवत घेत नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात सेंगोलची स्थापना केली. सोहळ्याची सुरुवात पूजाविधीने झाली.ही पूजा सुमारे तासभर चालली. नवीन संसदेत सेंगोल बसवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही इमारत बांधणाऱ्या मजुरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मजुरांचा सत्कारही केला.

नवीन संसदेच्या उद्घाटनाबद्दलचे 10 वाद…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube