Download App

Amruta Khanvilkar: उफ्फ ये अदाये! मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं मुंबई पोलिसांच खास कौतुक, म्हणाली…

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकरने एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट मुंबई पोलिसांची असून तिने पोस्टवर 'उफ्फ ये अदा!' असे म्हटले आहे.

Amruta Khanvilkar On Mumbai Police: ‘लुटेरे’ वेबसीरिजमधून 2024 वर्षांची सुरूवात करणारी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आता आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये (Hindi web series) दिसणार आहे. ती अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील चाचा विधायक है हमारे 3मध्ये झळकणार आहे. लुटेरेमधली अविका ते आता चाचा विधायक है हमारे 3 मधली सुरेखा जी असा अमृताचा बॉलिवूड प्रवास अखंड सुरूच आहे.


सध्या सोशल मीडियावर (social media) दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ बद्दल (Hiramandi) चर्चा होताना दिसतात, अश्यातच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) हिरामंडी डायलॉग स्टाईलमध्ये प्रेक्षकांना खास संदेश दिले आहेत. अभिनेत्रीने ही पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेयर करून मुंबई पोलिसांच खास कौतुक केलं आहे.

अमृताने एक इंस्टाग्राम स्टोरी टाकून मिश्किलपणे मुंबई पोलीस आणि त्यांचा भन्नाट क्रिएटिव्हच कौतुक केलं आहे. ‘मुंबई पोलीस गॉट नो चिल्ल उफ्फ ये अदाये’ अस खास कॅप्शन देत तिने त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी 24/7 काम करणाऱ्या मुंबई पोलिसांच करावं तेवढं कमीच आहे. कायम नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी ते त्यांना आव्हान करत असतात पण मुंबई पोलीस यांनी एकदम फिल्मी स्टाईल आता नागरिकांना सुरक्षित राहण्याच आव्हानं केलं आहे.

अमृता कायम तिच्या सोशल मीडियावरून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे आणि तिची आजची ही स्टोरी नक्कीच मुंबई पोलीस यांच्यासाठी खास आहे.

Purush: जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अमृताचा कामाविषयी

अमृता खानविलकर नुकताच जय मेहता यांच्या ‘लुटेरे’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. या सीरिजमधील तिच्या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली. तसेच आगामी काळात तिचा ‘पठ्ठे बापूराव’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

follow us