Amruta Khanvilkar: मराठमोळ्या अभिनेत्रीने आई- बाबा सोबत केला लंडन प्रवास, पाहा फोटो
Amruta Khanvilkar: मराठमोळ्या (Amruta Khanvilkar) अभिनेत्री अमृताने आई- बाबा सोबत केला लंडन प्रवास, पाहा फोटो
Amruta Khanvilkar
अमृता तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय करताना दिसतेय. आई बाबा आणि अमृता यांची लंडन ट्रीप ही मज्जा मस्तीची असणार आहे यात शंका नाही. अमृता तिच्या सोशल मीडियावर अनेक ट्रीप फोटोज् शेयर करत आहे आणि त्यातून तिची लंडन ट्रीपची झलक बघायला मिळते.
अमृताने तिच्या लंडन ट्रीप बद्दल नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली यात ती म्हणते " पालकांसोबत एका वयानंतर प्रवास करताना जाणवतं की आपण लहान मुलांसोबत प्रवास करतोय.
त्यांचा सोबत फिरण्याची एक वेगळी मज्जा असते, मग ट्रीप मध्ये होणारे किस्से आणि प्रत्येक गोष्टीचा फोटो काढण्याच त्यांचं कुतूहल बघून गंमत वाटते.
