36 Day: अमृता खानविलकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटात झळकणार

Amruta Khanvilkar Upcoming Movie: हल्ली मराठी मधील अनेक कलाकार नवनवीन बॉलिवुड (Bollywood) प्रोजेक्टमध्ये दिसत आहेत.

36 Day: अमृता खानविलकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटात झळकणार

36 Day: अमृता खानविलकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या आणखी एका चित्रपटात झळकणार

Amruta Khanvilkar Upcoming Movie: हल्ली मराठी मधील अनेक कलाकार नवनवीन बॉलिवुड (Bollywood) प्रोजेक्टमध्ये दिसत आहेत. त्यात अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हीच नाव आपसूक येतच.अमृता 2024 या वर्षात अनेक बॉलिवुड प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचा चर्चा होत असताना ती पुन्हा एकदा टसोनी लिव्हच्या ’36 डेट’ (36 Day Movie) या नव्या वेब शो मधून दिसणार आहे. कायम वेगळ्या भूमिका साकारणारी अमृता या प्रोजेक्टमध्ये नक्कीच वेगळी भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.


वर्षाच्या सुरुवातीला अमृता ‘लुटेरे’, ‘चाचा विधायक है हमारे 3’ मध्ये दिसली होती आणि आता ती ’36 डे’मध्ये झळकणार आहे. अमृताने सोशल मीडिया वर पोस्ट शेयर करून ही खास बातमी प्रेक्षकांना दिली आहे. 36 डे मध्ये शारिब हाश्मी, नेहा शर्मा यांच्यासोबतीने अनेक कलाकार दिसणार आहेत.

अमृता नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणते, ‘एका हिंदी प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा मी मराठी मुलीचं पात्र साकारत आहे आणि ही भूमिका नेहमीच्या भूमिका पेक्षा नक्कीच वेगळी आहे.विशाल फुरिया हा माझा चांगला मित्र आहे आणि त्याचा सोबत ही वेब सीरिज करायला मिळणं हा एक खास योग या निमित्ताने जुळून आला. 30 ते 40 दिवस गोव्यात शूट केलेली ही वेब सीरिज माझ्यासाठी खूप कमालीचा अनुभव होता सोबतीला शारीब हाश्मी सारख्या कलाकाराच्या सोबत एवढ्या जवळून काम करायला मिळाल. 36 डे मध्ये शारिबची भूमिका आणि माझी भूमिका विरुद्ध बाजूला आहे आणि ही दोन पात्र विचारांच्या बाहेरची आहेत.

Anant-Radhika Pre-Wedding सोहळा ‘या’ आलिशान क्रूझवर होणार; किंमत अन् वैशिष्ट्ये ऐकून व्हाल थक्क!

अमृता आगामी काळात ‘कलावती’,’ललिता बाबर’,’पठ्ठे बापूराव’यामधून प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे. सोशल मीडियावर अमृताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्सची माहिती ती प्रेक्षकांना देत असते. आता 36 डे नक्की काय असणार? अमृताची कशी भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Exit mobile version