Download App

सिनेमागृहांना इंग्रजी सबटायटल्सचे वावडे; ‘आत्मपॅम्फ्लेट’दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

Aatmapaphlet Movie : आशिष बेंडे (Ashish Bende) दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी (Paresh Mokashi) लिखित ‘आत्मपॅम्फ्लेट’ (Aatmapaphlet) चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपट समिक्षकांकडून देखिल चांगले रेटींग मिळाले आहे. पण सिनेमागृहात या मराठी चित्रपटाचे इंग्रजी सबटायटल्स दाखविले जात नाहीत. यामुळे अमराठी प्रेक्षकांची गैरसोय होत आहे. याबाबत दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी खंत व्यक्त करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आशिष बेंडे यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘सेन्सॉर प्रमाणपत्र इंग्रजी सबटायटल्ससह आहे, असं असतानाही काही सिनेमागृहे आत्मपॅम्फ्लेट  चित्रपटाचे इंग्रजी सबटायटल्स दाखवत नाहीत? ते माझ्या आकलनापलीकडचे आहे. मराठी सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेल्या आणि या गैरसोयीमुळे निराश झालेल्या सर्व अमराठी प्रेक्षकांची मी मनापासून माफी मागतो. मला माफ करा मित्रांनो.

मोहीम फत्ते; आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी,107 पदकांवर कब्जा

73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन 14 प्लस’ स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली होती. ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट एका तरुण मुलाभोवती फिरणारा आहे, जो त्याच्या क्सासमेटच्या प्रेमात पडतो. ही एकतर्फी प्रेमाची ह्रदयस्पर्शी कहाणी आहे. जी त्याच्या भोवतालच्या नाट्यमय सामाजिक-राजकीय बदलांच्या पलिकडे जाणारी आहे. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुंडे आणि केतकी सराफ यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags

follow us