An emotional post from Karan Deol for Sunny Deol : फादर्स डेच्या निमित्ताने अभिनेता करण देओलने आपल्या वडिलांसाठी, अभिनेता सनी देओल यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्याने त्यांच्या आगामी ‘बटवारा 1947’ या चित्रपटातील काही खास फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये सनी देओल आणि करण देओल यांच्यातील वडील-मुलाचे नाते, त्यांच्यातील भावनिक जिव्हाळा आणि पडद्यामागील खास क्षण पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ‘बटवारा 1947’ या चित्रपटाद्वारे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.
करण देओलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “काही क्षण हे नियतीने आधीच ठरवून ठेवलेले असतात. बाबांच्या चित्रपटाच्या सेटवर उभा राहून एक दिवस त्यांच्यासोबत अभिनय करण्याचे माझे स्वप्न मी त्यांना सांगितले होते. आज ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहणे, आणि त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात खास क्षण आहे.
रीलस्टार म्हणून हिणवणी, कुटुंबावर टीका आणि पक्षांतराच्या चर्चा; ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
14 ऑगस्ट 2026 रोजी ‘बटवारा 1947’च्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण होणार आहे. या भावना शब्दांत व्यक्त करणे माझ्यासाठी अशक्य आहे. मी त्यांना मुलगा, भाऊ, वडील, अभिनेता आणि लाखो चाहत्यांच्या हृदयातील सुपरस्टार म्हणून पाहिले आहे. मात्र सेटवर त्यांच्या जवळून काम करताना मला जाणवले की, त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते स्वतः आहेत—प्रामाणिक, नम्र, खंबीर आणि आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित.
हॅपी फादर्स डे पापा… तुम्ही माझे पहिले हिरो, माझे सर्वात मोठे मार्गदर्शक आणि कायमचा आधार आहात. हा क्षण तुमच्यासोबत जगता आल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.” करण देओल आणि सनी देओल पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत असल्यामुळे ‘बटवारा 1947’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. देओल कुटुंबाच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक भावनिक आणि संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याचे मानले जात आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
