Download App

Nakhrewali : जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय 2025 च्या व्हॅलेंटाईन डे ला घेऊन येणार ‘नखरेवाली’!

Nakhrewali Release Date: निर्माते आनंद एल राय यांच्या सहकार्याने त्यांच्या आगामी निर्मिती 'नखरेवाली'च्या (Nakhrewali) पहिल्या पोस्टरच अनावरण केल आहे.

Nakhrewali Release Date : जिओ स्टुडिओ (Jio Studios) आणि चित्रपट निर्माते आनंद एल राय (Anand L Rai) यांच्या सहकार्याने त्यांच्या आगामी निर्मिती ‘नखरेवाली’च्या (Nakhrewali) पहिल्या पोस्टरच अनावरण केल असून ज्यामध्ये नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव मुख्य भूमिकेत दिसणार असून 14 फेब्रुवारी 2025 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 2025 च्या व्हॅलेंटाईन डे ला (Valentine Day 2025) नखरेवाली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


जिओ स्टुडिओ -राहुल शांकल्या दिग्दर्शित कलर यलो प्रॉडक्शनचा उपक्रम असलेल्या या बॉलीवूडच्या रोम-कॉम मध्ये काय बघायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. चित्रपटा ची पहिली रोमांचक झलक नक्कीच खास आहे.जिओ स्टुडिओ आणि कलर यलो प्रॉडक्शन यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली असून पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘प्यार का नया नखरा लेके आ रहे हैं व्हॅलेंटाइन 2025 पर’ #JioStudios & #AanandLRai अभिमानाने #Nakrewaalii सादर करत आहेत.

या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त करताना आनंद एल राय म्हणाले की, जेव्हा आम्ही नखरेवालीची संकल्पना मांडली तेव्हा मला माहित होते आम्ही यांची निर्मिती करू. हा चित्रपट नक्कीच मनोरंजक असणार आहे यात शंका नाही. ज्योती आणि जिओ स्टुडिओच्या अतुलनीय पाठिंब्याने आम्ही सर्व वयोगटांसाठी लोकासाठी काही जादुई चित्रपट बनवू इच्छितो. नखरेवालीचा फर्स्ट लुक आउट करताना आनंद होत आहे. नखरेवालीसोबत अंश आणि प्रगतीच्या सारखे नवखे कलाकार आम्हाला सापडले. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांना या दोघांची ऊर्जा चित्रपटगृहांमध्ये अनुभवण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही.

Nakhrewali: आनंद एल राय यांच्या ‘नखरेवाली’ सिनेमाचे शुटिंग पूर्ण, पडद्यावर झळकणार हे नवे चेहरे

जिओ स्टुडिओ आणि कलर यलो प्रॉडक्शन्स उपक्रम संपूर्ण एंटरटेनर बनण्याचे वचन देतो जे संपूर्ण भारतभरातील प्रेक्षकांना भावतील अशा अनेक भावना देतात. ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओसह राय यांचे दुसरे सहकार्य झिम्मा 2 या मराठी फ्रँचायझीसह नुकतेच मिळालेल्या यशानंतर हा चित्रपट आहे. नखरेवाली नक्कीच खास ठरणार यात शंका नाही. राहुल शांकल्या दिग्दर्शित आणि दिव्य निधी शर्मा लिखित नखरेवालीची निर्मिती ज्योती देशपांडे आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांनी केली आहे.

follow us