Sanya Malhotra: सान्या मल्होत्राला मिसेस’साठी मिळाले सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन

Sanya Malhotra: सान्या मल्होत्राला मिसेस’साठी मिळाले सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन

Sanya Malhotra: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जवान’नंतर तिच्या आगामी ‘मिसेस’ (MRS Movie) सिनेमामुळे जोरदार आली चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सान्या या सिनेमासाठी चर्चेत आहे. ‘द ग्रेट इंडियन किचन’ (The Great Indian Kitchen) या मल्याळम सिनेमाची ही हिंदी आवृत्ती आहे. या सिनेमात सान्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरला खूप मोठा प्रतिसाद मिळाला.

आता अभिनेत्रीसाठी 2024 हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे आणि तिला ‘कठल’ मधील तिच्या अभिनयासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) देखील मिळाला आणि ती तिच्या आगामी ‘मिसेस’ चित्रपटाने जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये आपली कामगिरी दाखवली आहे. ‘मिसेस’ मधील तिच्या दमदार अभिनयासाठी प्रतिष्ठित न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये (New York Film Festival) ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठी तिला नामांकन मिळालं असून सान्यासाठी ही गोष्ट नक्कीच खास आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)


राजश्री देशपांडे, प्रियांका बोस आणि तनिष्ठा चॅटर्जी यांसारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित प्रतिभांसह सान्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ ची श्रेणी शेअर करणार आहे. ‘ सर्वोत्कृष्ट अभिनेता’ श्रेणीत, अमिताभ बच्चन, रोशन मॅथ्यू आणि इतरांना आपापल्या परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले होते. फक्त सान्याच नाही तर या चित्रपटाची दिग्दर्शिका आरती कडव हिने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे.

ही ओळख तिच्या भरभराटीच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यामुळे तिचा जागतिक स्टार म्हणून दर्जा मजबूत झाला आहे. ‘मिसेस’ हे स्त्रीत्व, नातेसंबंध आणि सामाजिक अपेक्षा यांच्या गुंतागुंतीचा शोध घेणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील सान्या मल्होत्राच्या भूमिकेने अभिनेत्रीची सर्वत्र प्रशंसा केली आहे.

Panchayat 4: ‘पंचायत 4’ ची तारीख कन्फर्म! ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित

सान्या मल्होत्राचे आंतरराष्ट्रीय नामांकन केवळ तिची अष्टपैलुत्व आणि वचनबद्धता अधोरेखित करत नाही तर ती उत्तम अभिनेत्री आहे हे दाखवून देते. कामाच्या आघाडीवर, ‘मिसेस’ व्यतिरिक्त सान्याचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’मध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि रोहित सराफ देखील दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज