Download App

Video Viral: आदित्य रॉय कपूरसोबत अनन्या पांडेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; कमेंट्सचा वर्षाव

Ananya Panday And Aditya Roy Kapur Video Viral: बॉलीवूडमध्ये सध्या आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अनन्या पांडे (Ananya Panday ) यांच्या रिलेशनशिपबद्दल चांगलीच जोरदार चर्चा रंगत आहे. स्पेन ट्रिप असो किंवा सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाचं रिसेप्शन हे दोघेही अनेक सोहळ्यांना एकत्र हजेरी लावत असल्याचे बघायला मिळतात. सध्या आदित्य आणि अनन्याचा मुंबईतील एका पार्टीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ (Video Viral) घालत आहे.


मुंबईतील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनरसाठी गेल्याचे या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. यावेळी दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले होते आणि अभिनेत्रीने आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याच पाहायला मिळत आहे. डिनर पार्टीला या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. रेस्टॉरंटमध्ये आदित्य- अनन्याचा रोमँटिक अंदाज बघायला मिळाला आहे.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. नेटकऱ्यांनी दोघांच्या या रोमँटिक व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने, आदित्य आणि अनन्या एकमेकांना शोभत नाहीत अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका चाहत्याने या व्हिडीओवर “आदित्य आणि अनन्या या दोघांचंही करिअर फारसं बरं सुरू नाहीये त्यामुळे ते एकत्र फिरत असतात” अशी प्रतिक्रिया दिल्याचे बघायला मिळत आहे. तसेच आदित्य-अनन्याच्या चाहत्यांनी ट्रोलर्सला उत्तर देत या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे बघायला मिळत आहे.

Chala Hawa Yeu Dya : खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप?

दरम्यान, दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अनन्या पांडे अलीकडेच आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमात झळकली होती. शिवाय आदित्य रॉय कपूर लवकरच अनुराग बासूच्या ‘मेट्रो इन दिनो’ सिनेमात सारा अली खानसह मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Tags

follow us