Download App

Aditya सोबतच्या फोटोंवरून अभिनेत्याने अनन्याला सुनावलं; म्हणाला, ‘अभिनय जमत नसलं तरी..’

Ananya Panday: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर (Social media) सध्या एका जोडीची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.  ही जोडी म्हणजेच अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday) या दोघांची चर्चा सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा जोरदार होत आहेत. त्यावर दोघांनी आता मनमोकळेपणे एकदाही भाष्य केले नाही.


परंतु आता त्याचा पुरावाच थेट चाहत्यांच्या हाती लागला आहे. स्पेनमध्ये (Spain) ते एकमेकांबरोबर रोमँटिक क्षण घालवतानाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनन्या आणि आदित्यच्या या हटके जोडीवर याअगोदर देखील काही चाहत्यांनी नापसंती दर्शविली होती. परंतु आता एका अभिनेत्यानेच थेट अनन्यालाच सुनावलं आहे. ‘अनन्या पांडे ही अभिनय करण्यात जरी कमकुवत असली तरी प्रेम करण्यात एकदम हटके असल्याचे दिसत आहे.

या मुलीला मिनिटा मिनिटांमध्ये प्रेम होतं. कधी आर्यनवर, तर कधी खट्टरवर (इशान खट्टर), कधी सिद्धांतवर तर कधी आदित्यवर. अशा फक्त फ्लॉप लोकांवरच ही प्रेम करत असते. तिने चंकी पांडेचं नाव चांगलंच उज्ज्वल केले आहे’, अशा तिखट शब्दांत या अभिनेत्याने अनन्याला सुनावलं आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान हा असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. आदित्य आणि अनन्याला स्पेनमधील लिस्बॉनमध्ये एकमेकांबरोबर पाहिलं गेलं आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

त्याअगोदर दोघांनी एकत्र आर्क्टिक मंकीज या रॉक बँडच्या कॉन्सर्टला एकत्रच हजेरी लावली होती. दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीजत कॉन्सर्टचे फोटो पोस्ट केले होते. तेव्हापासून त्यांच्या स्पेन व्हेकेशनची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. परंतु स्पेनमधील जेव्हा या दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत, तेव्हा मात्र त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा सुरु झाल्याचे दिसत आहे.

यावेळी दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अनन्याला मिठी मारत आदित्य स्पेनमधील सूर्यास्त बघत असल्याचा हा फोटो व्हायरल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गेल्या वर्षी जेव्हा या दोघांनी एकत्र अभिनेत्री क्रिती सनॉनच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत असल्याचे दिसत आहे. मात्र दोघांनीही त्यावर आतापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता फोटो व्हायरल झाल्यापासून काही नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Tags

follow us