Animal : लग्नानंतरच्या नौकझौकीची झलक! रणबीर-रश्मिकाच्या अॅनिमलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Animal : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणं‘हुआ मैं’ नंतर आता ‘सतरंगा रे’ गाणं रिलीज करण्यात आलं आहे. लग्नानंतरच्या नौकझौकीची झलक! रणबीर रश्मिकाचं हे गाणं लग्नानंतरच्या नवरा-बायकोमधील छोट्या-छोट्या कुरबुरी दाखवणारं आहे. […]

Animal

Animal

Animal : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणं‘हुआ मैं’ नंतर आता ‘सतरंगा रे’ गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

लग्नानंतरच्या नौकझौकीची झलक!

रणबीर रश्मिकाचं हे गाणं लग्नानंतरच्या नवरा-बायकोमधील छोट्या-छोट्या कुरबुरी दाखवणारं आहे. ‘सतरंगा रे’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक अरजीत सिगंने गायलं आहे. तर श्रेयस पुराणिक यांनी कंपोज केलं आहे. तसेच सिद्धार्थ आणि गरिमा या जोडीने हे गाणं लिहिलेलं आहे. या गाण्यामध्ये रणबीर आणि रश्मिकाची खास केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

Telangana Assembly Elections : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन निवडणुकीच्या स्पीचवर, कॉंग्रेसकडून दुसरी यादी जाहीर

संदीप वंगा रेड्डी यांचे दिग्दर्शन असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट रणबीर कपूरच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा असून, आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉयच्या इमेजमध्ये दिसलेला रणबीर या चित्रपटात प्रेक्षकाना ‘ग्रे शेड’ हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर आणि रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Pak vs SA: रोमहर्षक सामन्यात आफ्रिका एका विकेटने जिंकली ! पाकिस्तानने गाशा गुंडाळला?

रणबीर आणि रश्मिका यांच्याशिवाय या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी असल्याचे संदीप रेड्डी यांनी सांगितले आहे. ‘अॅनिमल’ हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Exit mobile version