Download App

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘अ‍ॅनिमल’ने रचला इतिहास, रणबीर कपूरचा बोलबाला

Animal Box Office Collection Day 11: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘अॅनिमल’ (Animal Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा चित्रपट दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक व्यवसाय करत आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. ‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून हा चित्रपट मोठी कामगिरी करत आहे.


रणबीर कपूर आणि बॉबी देओल (Bobby Deol) या दोघांच्या अॅक्शन थ्रिलरने भारतात 443.27 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. लवकरच तो 500 कोटींचा टप्पा पार करेल. अॅनिमलने जगभरात 700 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 737.98 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाबाबत बोलले जात आहे की, 12व्या दिवशी हा चित्रपट 450 कोटींचा आकडा पार करू शकतो. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाईपैकी, चित्रपटाने केवळ हिंदी आवृत्तीतून 400.37 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अॅनिमलने पहिल्याच दिवशी 63.8 कोटींचा व्यवसाय केला. जे ओपनिंग डे साठी खूप जास्त आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरत आहे. शिवाय बॉबी देओलचेही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 66.27 कोटी होते. जे पहिल्या दिवसापेक्षा किंचित जास्त आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. चित्रपटाने 7.8 टक्के वाढीसह 71.46 कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 38.48 टक्के घट झाली आणि एकूण कलेक्शन 43.96 कोटी रुपये झाले आहे.

Disha Salian: दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT ची स्थापना; सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश

चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पाचव्या दिवशी आणखी 14 टक्के घट झाली आणि दिवसअखेर 37.47 कोटी रुपयांची कमाई झाली. यानंतर, चित्रपटाने सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटींचा व्यवसाय केला आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी 23.50 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 361.80 कोटींवर पोहोचले आहे. 9व्या दिवशी चित्रपटाने 34.74 कोटींची कमाई केली, 10व्या दिवशी 36 कोटींची कमाई केली आणि 11व्या दिवशी चित्रपटाने भारतात 13 कोटींचा व्यवसाय केला.

‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे. यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात बॉबी देओलची भूमिकाही महत्त्वाची आहे. अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे आणि रश्मिका मंदान्ना रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी, प्रेम चोप्रा हे देखील आहेत.

Tags

follow us