Ranbir Kapoor च्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे वाटतात; असं का म्हणाले दिग्दर्शन वांगा?
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या <strong>अॅनिमल चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या चाहते या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेमुळे प्रभावित झाले आहेत. त्यामध्ये लोकांच्या तोंडात केवळ चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन सीन्स, आक्रमकपणा, अतिशयोक्तीपणा असं सगळ बोललं जात आहे. पण रणबीरचा चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी आलेल्या अनुभवावरून चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी मात्र वेगळच विधान केलं आहे.
असं का म्हणाले दिग्दर्शन वांगा?
अॅनिमल चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत कामाचा अनुबाव आल्यानंतर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी एक विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘रणबीर माझ्यापेक्षा लहान आहे. पण मी जेव्हा त्याला परफॉर्म करताना पाहतो. तेव्हा मला त्याच्या पायांना स्पर्श करून त्याचे आशीर्वाद घ्यावे वाटतात. त्याच्या एवढी सहनशीलता मी पाहिलेली नाही.’ त्यांच्या या विधानामुळे एकीकडे चित्रपटात रणबीर आक्रमक दाखवला आहे. पण तो प्रचंड सहनशील असल्याचं दिसत आहे.
Club 52: ‘पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा, हार्दिक जोशीच्या ‘क्लब 52’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमलमध्ये रणबीर कपूरशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मीका मंदान्ना सारखे कलाकार दिसत आहेत. पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित हा एक रिव्हेंज ड्रामा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सातत्याने नवीन रेकॉर्ड बनवत आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. अॅनिमलने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला कमावला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटातील रणबीर कपूरचा रक्तबंबाळ आणि अॅक्शन अवतार चाहत्यांना आवडला आहे.
New Chief Minister : एमपी, छत्तीसगड राजस्थानचा CM कोण? BJP करणार नवा चमत्कार
18 मिनिटांच्या सीन्ससाठी मोजले एक कोटी…
या चित्रपटातील एका सीन्समध्ये गुंड जेव्हा रणविजय बलवीर सिंगच्या घरी मारण्यासाठी घुसतात तेव्हा एक ब्लास्ट गोळीचं दृश्य दिसतं. या दृश्यात दिसत असलेली फायटर मशीनच्या सीन्सवर प्रेक्षकांनी चांगलाच टाळ्यांचा कडकडाट केल्याचं पाहायला मिळालं. ही फायटर मशीनगन महाराष्ट्रात जोडण्यात आली होती. या फायटर मशीनसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च आला. 18 मिनिटाच्या या सीन्ससाठी या मशीनची निर्मीती भारतातच करण्यात आली होती.