Club 52: ‘पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा, हार्दिक जोशीच्या ‘क्लब 52’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज

Club 52: ‘पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा, हार्दिक जोशीच्या ‘क्लब 52’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज

Club 52 Trailer Released Out : अभिनेता हार्दिक जोशीची (Hardik Joshi) अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या “क्लब 52” (Club 52 Movie) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. (Club 52 Trailer Released ) नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. नुकतंच या सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे. “क्लब 52” या चित्रपटाची एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन आहे. कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. चित्रपटात अॅक्शनची भरमार आहे, शिवाय संवादही खटकेबाज आहेत.

महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन या सिनेमाला लाभले आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ या सिनेमाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून सिनेमाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटाबद्दल चाहत्यांना देखील अधिक उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे.

Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला

काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचा दिसतो आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीजरमुळे या चित्रपटानं आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आता केवळ 15 डिसेंबरपर्यंत थांबावं लागणार आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून, हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube