Download App

Animal Movie Marathi Seen : आधी नकार नंतर होकार, उपेंद्रनं असा साकारला ‘अ‍ॅनिमल’चा ‘फ्रॅडी’ !

Animal Movie Marathi Seen : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट (Animal Movie Marathi Seen) नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींचा गल्ला जमवला. चित्रपटातील गाणी, एक से बढकर एक सीन, रणबीरचा दमदार अभिनय त्याला रश्मिकाची साथ. दुसरीकडे मराठमोळा अभिनेता उपेंद्रचा ‘फ्रॅडी पाटील’ रणबीर उपेंद्र अन् संदीप रेड्डीच्या अभिनयाची भट्टी जमली. उपेंद्रच्या चित्रपटातील अभिनयाचे हजारो रिल्स तयार झाले. व्हायरलही झाले. हाच फ्रॅडी पाटील घरघरात ओळखला जाऊ लागला. पण, यात खरा किस्सा वेगळाच आहे. या भुमिकेत कदाचित उपेंद्र लिमये (Upendra Limaye) दिसला नसता. कारण, या सिनेमात काम करण्यास आधी त्याने नकार दिला होता. नंतर ज्यावेळी स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी काही गोष्टी पटवून दिल्या. त्यानंतर उपेंद्रने ही भूमिका साकारली. यासाठी पडद्यामागे काय किस्सा घडला याचा खुलासा स्वतः उपेंद्र लिमयेने लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला.

रणबीर स्टारर अ‍ॅनिमल चित्रपटाला प्रचडं यश मिळालं. या चित्रपटाला आधी नकार दिल्यानंतर असं काय घडलं की ज्यामुळे चित्रपट पुन्हा स्वीकारला?  असा प्रश्न विचारला. त्यावर उपेंद्रने पडद्यामागं काय घडामोडी सांगितल्या. मला याबाबत काहीच माहिती नव्हतं. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्या सहाय्यकाचा फोन आला. हा एक मोठा सिनेमा आहे यात रणबीर कपूर अभिनय करणार आहे. एक सीन करणार का? असं मला विचारलं. मी म्हणालो एक सीनमध्ये मला काही फार इंटरेस्ट नाही. कारण, तसं सिलेक्टेड काम मी हिंदीत केलं आहे. एका वेळेला चांगलं काम मिळालं नाही म्हणून मी हिंदीतलं काम बंदही केलेलं आहे. त्यापेक्षा उत्तम आणि दर्जेदार काम मला मराठीत करायला मिळत होतं, त्यामुळे माझ्याकडे पर्याय होता. मी त्याला सांगितलं, छोटी भूमिका असेल तर उगाच मला गळ घालू नकोस कुणीतरी दुसरा बघ. नकार दिल्यानंतर तो पुन्हा म्हणाला की तुमचा नंबर मी संदीप रेड्डी यांना दिला तर चालेल का? मी नकार दिला नाही.

संदीपला ‘सरकार’मधील माझं काम आवडलं

नंतर त्याने मला फोन करून सांगितलं की संदीप सरांना तुमच्याशी एकदा बोलयचं आहे. त्यावेळी मला असं वाटलं की संदीप रेड्डी हा साऊथचा माणूस. हिंदीशीही फारसा कनेक्ट नाही. तो इतका उपेंद्र उपेंद्र का करतोय? मी त्याला भेटायला गेल्यावर त्यानं मला माझाच गुगलवरचा एक फोटो दाखवला आणि म्हणाला मी तुझी फार कामं पाहिली नाही पण मला तुझं ‘सरकार’ चित्रपटातलं काम फार आवडलं. त्यामुळे तू माझ्या चित्रपटात काम केलेलं मला खूप आवडेल.

मला हा सुखद धक्का होता की त्याला माझ्याबद्दल इतकं माहिती होतं. ही कलाकार म्हणून सुखावणारी गोष्ट असते. त्यानं आग्रह केला म्हणून मी या चित्रपटात  (Animal Movie Marathi)  काम करण्यास तयार झालो. चित्रपटात महत्वाच्या क्षणी तुझी भूमिका आहे, हे त्यानं मला पटवून सांगितलं. मग मलाही वाटलं की यात काहीतरी वेगळं आहे. तरीदेखील मी म्हणालो, मी स्पेशल अपिरियन्स म्हणून काम करील. तसेच दुसऱ्याही चित्रपटात काम करत असल्याने केस किंवा मिशा काढणार नाही हे देखील सांगितलं. त्यावर संदीप खूश होत म्हणाला, तू काम करतोस आहे ना हेच माझ्यासाठी खूप आहे. मी होकार दिल्यानंतर चित्रपटाचे सीन्स समजावून सांगितले.

Animal Movie Marathi Seen : ‘अ‍ॅनिमल’चा ‘मराठी’ चेहरा; मराठमोळ्या कलाकारांची सिनेमात हवा !

रणबीर जमिनीवरचा कलाकार 

रणबीर हा खरंच जमिनीवरचा (ग्राउंडेड) कलाकार आहे. बाकीच्या कलाकारांकडे पाहिलं की त्यांच्या मागे गर्दी असते. पण, येथे असं काही नव्हतं. संदीपनेही त्याच्या या गुणाचं कौतुक केलं. कोणताही सीन असो, दिग्दर्शक जोपर्यंत पॅकअप म्हणत नाही तोपर्यंत हा माणूस उभाच असतो. दिग्दर्शकाच्या हाती त्यानं स्वतःला सोपवलेलं असतं. असं उत्कृष्ट काम रणबीरने या सिनेमात केलं असेही उपेंद्र म्हणाला.

Tags

follow us