प्रियांका गांधी यांची सून मुलगी कोण?, जाणून घ्या प्रियांका गांधी यांच्या सूनेबद्दल, मुलगा रेहान

दोन्ही कुटुंबियांनी या नात्याला होकार दिला असून साखरपुड्याची तयारी सुरू आहे. अविवा बेग आणि तिचे कुटुंब दिल्लीचे रहिवासी आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 31T141559.621

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या घरी मोठे शुभकार्य पार पडणार आहे. (Gandhi) प्रियांका गांधी सासूबाई होणार असून प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांच्या घरी सुनबाई येणार असून लवकरच प्रियांका गांधी यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडणार आहे.

प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच साखरपुडा करणार असून तयारीही सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रेहान वाड्रा दिल्लीतील मुलीला सात वर्षापासून डेट करत होता. रेहान वाड्रा याच्या प्रेयसीचे नाव अविवा बेगला असून सात वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगोदर साखरपुडा होईल आणि त्यानंतर खास लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न पार पडेल.

सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा; अभिनेत्री खुशी मुखर्जीचा खळबळजनक खुलासा

दोन्ही कुटुंबियांनी या नात्याला होकार दिला असून साखरपुड्याची तयारी सुरू आहे. अविवा बेग आणि तिचे कुटुंब दिल्लीचे रहिवासी आहेत. रेहान आणि अविवा बेग अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघे अगोदर एकमेकांचे मित्र होते, त्यानंतर ते प्रेमात पडले. नवीन वर्षाच्या सुरूवातीला दोघांचा साखरपुडा पार पडेल, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

हा साखरपुडा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत होईल. मात्र, नेमका कुठे याबाबत अजून माहिती पुढे आली नाही. रेहान वाड्रा हा मामा राहुल गांधी यांचा लाडका असून राहुल गांधीला रेहान वाड्रा याच्यासोबत वेळ घालवण्यास आवडतो. बऱ्याचदा प्रियांका गांधी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.

Tags

follow us