Animal Movie OTT release: थिएटरमध्ये प्रचंड नफा कमावल्यानंतर, रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) सुपरहिट चित्रपट ‘ॲनिमल’ (Animal Movie) OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होत आहे. 26 जानेवारीला हा चित्रपट सुरू झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी सोशल मीडियावर (social media) ट्रोलिंगला सुरुवात झाली. पूर्वी असे म्हटले जात होते की नेटफ्लिक्सवर ‘ॲनिमल’ विस्तारित कटसह येणार आहे, मात्र तसे काही झाले नाही.
8 ते 9 मिनिटांच्या अधिक फुटेजसह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा प्रीमियर होईल, असा दावा अनेक अहवालात केला जात होता. ज्यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या ओटीटी आवृत्तीबद्दल आनंद झाला, मात्र तसे झाले नाही. चित्रपटात कोणताही विस्तारित कट नाही, त्यामुळे आता सोशल मीडियावर नेटफ्लिक्सला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. विस्तारित आवृत्ती कधी प्रसिद्ध होत आहे, असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने ॲनिमलला ‘A’ प्रमाणपत्र दिले होते आणि त्यात पाच कट करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून असे म्हटले जात होते की, त्याचे अनकट व्हर्जन ओटीटीवर रिलीज होईल. पण असे आजिबात झाले नाही.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून बॉबी देओलचीही दमदार भूमिका आहे. शिवाय अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर आणि प्रेम चोप्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
बॉबी देओलने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले होते. या चित्रपटाने जगभरात 800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. या चित्रपटाची टक्कर विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’शी झाली. दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले, पण ‘सॅम बहादूर’ ‘ॲनिमल’ला टक्कर देऊ शकला नाही.