Animal Song Hua Main : Animal चे नवे पोस्टर आउट! लिपलॉक करताना दिसले रश्मिका अन् रणबीर

Animal Song Hua Main : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. मात्र, चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘हुआ मैं’ चे पोल्ट्र रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मीका मंदानाचे (Rashmika Mandanna) लीप लॉक करतानाचे […]

Letsupp Image   2023 10 11T112838.864

Letsupp Image 2023 10 11T112838.864

Animal Song Hua Main : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. मात्र, चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘हुआ मैं’ चे पोल्ट्र रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मीका मंदानाचे (Rashmika Mandanna) लीप लॉक करतानाचे पोस्टरवर दिसून येत आहे. मनोज मुंतशीर यांनी लिहिलेल्या या गाण्याची चाल प्रीतम यांनी संगीतबद्ध केली असून, या गाण्यात रणबीर आणि मंदानाची उत्तम केमेस्ट्री पाहण्यास मिळत आहे. (Animal Movie Hua Mai Poster)

Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण

संदीप वंगा रेड्डी यांचे दिग्दर्शन असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट रणबीर कपूरच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा असून, आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉयच्या इमेजमध्ये दिसलेला रणबीर या चित्रपटात प्रेक्षकाना ‘ग्रे शेड’ हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हुआ मैं’ गाण्याचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता लवकरच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टरमध्ये रणबीर-रश्मिका रोमँटिक

हुआ मैं या गाण्याच्या रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये रणबीर आणि रश्मिकाची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत असून, यात दोघेही कानाला हेडफोन लावून लीपलॉक करत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार ‘अ‍ॅनिमल’

रणबीर आणि रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, रणबीर आणि रश्मिका यांच्याशिवाय या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

अॅनिमल चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्येच रिलीज होणार होता. त्यानंतर ही रिलीजची तारीख बदलून आता तो 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी असल्याचे संदीप रेड्डी यांनी सांगितले आहे. ‘अॅनिमल’ हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Exit mobile version