Download App

Animal : टाइम्स स्क्वेअरवर झळकला अ‍ॅनिमल; टीझरने जगभरातील चाहते मंत्रमुग्ध

Animal : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. त्यात आता या चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे जगभरातील चाहत्यांना या टीझरने मंत्रमुग्ध केले.

टीझरने जगभरातील चाहते मंत्रमुग्ध…

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या अ‍ॅनिमल या चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे जगभरातील चाहत्यांना या टीझरने मंत्रमुग्ध केले. त्यामुळे हा चित्रपट जगभरात पोहचला आहे. हा टीझर जेव्हा टीझर न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी न्युयॉर्कमधील लोक आणि पर्यटकांना त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची मोठी घोषणा ! भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेणार

दरम्यान अ‍ॅनिमल चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्येच रिलीज होणार होता. त्यानंतर ही रिलीजची तारीख बदलून आता तो 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी असल्याचे संदीप रेड्डी यांनी सांगितले आहे. ‘अ‍ॅनिमल’ हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Tags

follow us