आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर ! भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळाव्याची घोषणा

  • Written By: Published:
आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर ! भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळाव्याची घोषणा

अहमदनगर: गोपीनाथ मुंडे हे भगवानगडावर दसरा मेळावा घेत. या मेळाव्यासाठी राज्यातील, देशातील राजकीय नेतेही येत होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावर राजकीय भाषणे करण्यास गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बंदी घातली. त्यावरून बराच वाद झाला. पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला. त्यानंतर थेट सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. पण आता दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक राहिलेले व आता बीआरएसमध्ये असलेले बाळासाहेब सानप (Balasheb Sanap) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सानप यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर (Bhagwangad) हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पुढच्या वर्षी भगवान गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणाच सानप यांनी केली. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशीच सावरगाव व भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा म्हणजे एकाच दिवशी सानप व मुंडेंची शक्तिप्रदर्शन होणार आहे.

Pankaja Munde : ‘तुमचं प्रेम हेच आशीर्वाद पण, पैसे पाठवू नका’; पंकजांची भावनिक साद

बीआरसचे नेते बाळासाहेब सानप यांचे भगवान महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोठे जाळे आहे. आता मात्र ते भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात गेल्याने महाराष्ट्रभर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वंजारी समाज आणि एकूणच ओबीसी मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

‘पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही’; ‘भाजप सोडणार’ म्हणणाऱ्यांना सुनावलं

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना राजकीय भाषण करण्यापासून गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बंदी घातल्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यानंतर पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी भगवान बाबा यांच्या जन्मगावी म्हणजे बीड जिल्ह्यातील घाट सावरगाव या गावी भगवान भक्तीगडाची निर्मिती केली. आता याच ठिकाणी त्यांचा दसरा मेळावा होत असतो. आता बाळासाहेब सानप यांनी देखील गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा भगवानगडाचा दसरा मेळाव्याची चर्चा सुरु झाल्या आहेत.


सानप यांना नामदेव शास्त्रींचे आशीर्वाद

आज सानप यांनी भगवानगडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. सोबत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेत नामदेव शास्त्री यांचे देखील आशीर्वाद घेतले. यावेळी ते म्हणाले, मी भगवानगडावर राजकीय नेता म्हणून नाही तर भगवानबाबांचा भक्त म्हणून आलेलो आहे. कुठलेही राजकीय वक्तव्य मी भगवानगडावरून करणार नाही मात्र पुढच्या वर्षी गडाच्या पायथ्याला व्यासपीठ टाकून मोठा दसरा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केल आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube