‘पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही’; ‘भाजप सोडणार’ म्हणणाऱ्यांना सुनावलं

‘पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही’; ‘भाजप सोडणार’ म्हणणाऱ्यांना सुनावलं

Pankja Munde : पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही, या शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप सोडणार म्हणणाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढंच नाहीतर पंकजा मुंडे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात होतं. अखेर आज पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दसऱ्यानिमित्त सावरगाव इथल्या भगवान बाबा गडावर आज मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुंडे बोलत होत्या.

प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानकडून दसऱ्याचा खास संदेश; इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरुन चिंता…

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्याविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतं या पक्षात चालले तर कोणी म्हणतयं या पक्षात, पण पंकजा मुंडेंची निष्ठा एवढी लेचीपेची नाही
पदं न देता निष्ठा काय असते ते जनतेला विचारा. निवडणुकीत मी पडले तर पडले पण ब्रम्ह, विष्णू महेशसुद्धा युद्धात हरले आहेत. या त्रिदेवांनाही संकट आहे तर युद्धाला आपण का नाही तयार राहणार. हजार वेळा हरलात तरी लोकं तुमच्या गळ्यात सन्मानाने हार घालतात. माझी निष्ठा एवढी लेचीपेची नसल्याचंही मुंडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

‘…हे कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण’; ‘त्या’ व्हायरल फोटोवर शशी थरुर यांनी सोडलं मौन

तसेच कामे करीत असताना जात धर्म कधीच पाहिला नाही. निवडणुकीत राजकारणात कधीतरी लोकं पडतातच ना. आता मला कुबड्या घेऊन चालावं लागेल. शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून जनतेने मला एवढ्या कुबड्या दिल्या की मी दोन महिन्यात मॅरेथॉनमध्ये पळायला लागले आहे.

आतापर्यंत 8 वेळा कोहलीचे शतक हुकलं, ‘या’ संघांनी सेंच्युरी होऊ दिली नाही

शिवशक्ती यात्रेनंतर वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई झाली. त्यानंतर जनतेने मला तब्बल 11 कोटी रुपये गोळा करुन दिले तेव्हा मला समजलं की मी त्यांची नाहीतर तुमची कर्जदार आहे. आता माझं सर्वस्व जनताच. जिथं जनतेचं भल तिथेच पंकजा मुंडे नतमस्तक होणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

Maratha Reservation : ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी’.. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर CM शिंदेंचा शब्द

ताईपासून आता आईच्या भूमिकेत :
राजकारणात आल्यानंतर मला गोपीनाथ मुंडेंनी कानमंत्र दिला. ते म्हणाले की, पंकजा तुझ्या पदरात ही जनता टाकतोयं त्यांची काळजी घे. राजकारणात ताईपासून आता मी आईच्या भूमिकेत आहे. सध्या मी जनतेची आई आहे. दुसऱ्यांचं हडपून खाणं हे माझ्यात नाही. लोकं म्हणताहेत या ना त्या जागेवरुन लढा पण मी असं करणार नाही. वेळ पडली तर ऊस तोडेन पण स्वाभिमान गहाण ठेवणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube