Maratha Reservation : ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी’.. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर CM शिंदेंचा शब्द

Maratha Reservation : ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी’.. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर CM शिंदेंचा शब्द

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत राज्य सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिली होती. आता ही मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मनोज जरांगे यांनी नवी घोषणा करत सरकारचे टेन्शन वाढवले. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे आंदोलन पुढे आमरण उपोषणापर्यंत जाईल. आंतरवाली गावात कोणत्याही आमदार, खासदार आणि मंत्र्याला फिरकू देणार नाही, असा इशार जरांगे यांनी दिला. या घडामोडींनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाला आवाहन केले.

शिंदे म्हणाले, मराठा समाजातील आत्महत्या अतिशय दु्र्दैवी आहेत. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. मी कधीही कुणाला खोटं आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोर्टाने ज्या त्रुटी दाखवल्या आहेत त्यावर काम सुरू आहे. तसेच आम्ही क्युरेटिव्ह पीटिशनही दाखल केली असून कोर्टानेही ती दाखल करून घेतली आहे.

जरांगे पाटील पुन्हा आक्रमक ; 24 ऑक्टोबरपासून ना अन्न ना पाणी!

देवीच्या मंडपात शब्द देतो, दिशाभूल करणार नाही 

मराठा समाजाला सरकार काय देतं याचा उल्लेख आजच्या जाहिरातीत केला आहे. साडेआठ टक्के आरक्षण मराठा समाजाचे तरुण घेतात हे चांगलं आहे. आज मी देवीच्या मंडपात शब्द देतोय खोटं बोलणार नाही मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही. मराठवाड्यात कुणबी दाखला देण्यासंदर्भात जुन्या नोंदी तपासण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेंची कमिटी स्थापन केली असून त्यांना पाच ते सहा हजार नोंदी सापडल्या आहेत. आजही त्यावर काम सुरू आहे. मराठा समाजातील तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, थोडा धीर धरा सरकारला वेळ द्या, अशी विनंती शिंदे यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज