#AnkitaLokhande talks abt SSR, what a great man he was, his funeral, how it’s difficult talking abt him in past tense n breaks down remembering him n her dad ❤️#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/MWUshVXPG0
— Rachit (@rachitmehra_2) November 20, 2023
बिग बॉस 17 च्या एपिसोडमध्ये मुनावर फारुकी आणि अंकिता सुशांतबद्दल बोलताना असल्याचे बघायला मिळाले. मुनव्वर यांनी कविता वाचली, त्यानंतर अंकिताने सुशांतच्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील ‘कौन तुझे यूं प्यार करेगा’ हे गाणे गायले. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुशांतने क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची भूमिका साकारली होती. अंकिता आणि सुशांत जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते.
सुशांतच्या आठवणीत अंकिता मुनव्वरला पुढे म्हणाली की, “तो खूप चांगला माणूस होता. तो होता असं कधी मी म्हणते तेव्हा मला खूप वेगळंच वाटतं. आता तरी सगळं ठीक आहे, सगळं नॉर्मल झालं आहे. सुशांत विकीचाही चांगला मित्र होता. तो या जगात नाही, हे जेव्हा मला समजलं तेव्हाची भावना सर्वांत वाईट होती.” हे ऐकल्यानंतर मुनव्वर अंकिताला सुशांतच्या निधनाबद्दल विचारते. त्यावर ती पुढे म्हणते, “मला आता त्याविषयी बोलायचं नाहीये आणि मला तुला काहीच सांगायचं नाही
काही वेळानंतर मुनव्वर सांगितलं की, प्रत्येकाकडे तुमच्या कथेच्या वेगवेगळ्या व्हर्जन आहेत. पण तूच आहेस ज्याला नेमकं काय ते माहीत आहे. यावर अंकिता म्हणाली, माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, पण तरीही ठीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यापासून दूर जाते तेव्हा आपल्याला समजते. असा कोणीतरी गमावण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. हा अतिशय धक्कादायक अनुभव होता. मी त्याच्या अंत्ययात्रेलाही जाऊ शकले नाही. मला वाटले की मी हे पाहू शकणार नाही. मात्र विकी मला म्हणाला होता की तू जाऊन ये. मी त्याला नकार दिला. मी सुशांतला असं कसं पाहू शकते? मी माझ्या आयुष्यात तसे क्षण कधीच अनुभवले नव्हते”, असं अंकिता सांगते.
‘एक अपघात अन्…’; पंकज त्रिपाठींच्या ‘कडक सिंग’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
अंकिता पुढे म्हणाली, मी माझ्या वडिलांना पहिल्यांदा असे पाहिले. मग मला कळले की एखाद्याला गमावणे म्हणजे काय. असे म्हणत अंकिता लोखंडेला वडिलांची आठवण करून रडू कोसळले. अंकिताचे वडील शशिकांत यांचे यावर्षी 12 ऑगस्ट रोजी निधन झाले. वडिलांच्या निधनाने अंकिताला खूप दुःख झाले.
अंकिता लोखंडे आणि सुशांत यांची पहिली भेट पवित्र रिश्ता टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर 2011 मध्ये सुशांतने नॅशनल टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शोच्या मंचावर अंकिताला प्रपोज केले. दोघांनी 2016 मध्ये त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती, मात्र अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते.