BIGG BOSS 17: पॉवर कपल अंकिता अन् विकी जैनची बिग बॉस 17 मध्ये दमदार एंट्री

BIGG BOSS 17: पॉवर कपल अंकिता अन् विकी जैनची बिग बॉस 17 मध्ये दमदार एंट्री

BIGG BOSS 17: बिग बॉसच्या (BIGG BOSS) दणक्याने सलमान खान पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे. रविवारपासून बिग बॉसचा 17वा सीझन (BIGG BOSS 17) सुरू झाला आहे. रविवारी या शोचा प्रीमियर पार पडला. सलमान खानने (Salman Khan) शोच्या पहिल्या दिवशी घरात राहणाऱ्या स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले आहे. यामध्ये मराठमोळी मुलगी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) बिग बॉस 17 मध्ये दमदार परॉर्मन्ससाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही सुपरहिट जोडीने बिग बॉसच्या घरात एंट्री घेत प्रेक्षकांना खुश केलं आहे. सुरुवातीला असलेली ही बातमी आता पक्की झाली असून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा बिग बॉसमधील सहभाग पक्का झाला आहे.हे कपल पवित्र रिश्ता मधील अर्चना या भूमिकेसाठी आणि ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी मधील झलकारी बाईच्या निर्भीड भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अंकिताने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

विकी जैन तिचा पती हा तिच्यासाठी कायम दाखवण्यात आला आहे. तसेच तिला चित्रपटांमध्ये हटक्या अंदाजात बघायला मिळत असते.बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना हे पॉवर कपल शोमध्ये नक्कीच उठून दिसणार आहे. चाहते देखील ही जोडी बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. अंकिता वर्कफ्रंट सांगायचं झालं तर तिच्या पुढील काही मालिकांची रिलीजची तयारी करत आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नीचे रणदीप हुडासोबत ती आगामी सिनेमात बघायला मिळणार आहेत.

भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वशीचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या पर्वामध्ये अनेक नवीनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यंदा बरेच ट्विस्ट ठेवण्यात आले आहे. घर तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि ते ‘दिल, दिमाग आणि दम’ या थीमवर आधारित असणार आहे. हा शो प्रेक्षकांना कलर्स टीव्हीवर बघता येणार आहे. तसेच जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर इथेही शोचे स्ट्रीमिंग केले जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube