Download App

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 मधील तिच्या अनफिल्टर्ड गेमने जिंकली प्रेक्षकांची मन

Bigg Boss 17 Ankita Lokhande: ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले अतिशय नेत्रदीपक आणि धमाकेदार होता. बहुप्रतिक्षित बिग बॉस 17 (Bigg Boss 17) फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला. सलमान खान (Salman Khan) होस्ट केलेल्या या शोमध्ये शेवट पर्यंत प्रेक्षकांची मन जिंकणारी स्पर्धक ठरली, ती म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ! मुनावर फारुकी (Munawar Farooqui), अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यासह अंकिता बिग बॉस 17 मधील पाच अंतिम स्पर्धकांमध्ये होती.


संपूर्ण गेममध्ये अंकिता ही सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक होती. पवित्र रिश्ता फेम अभिनेत्रीने घरातील सर्वात मजबूत सदस्यांपैकी एक बनून लाखो मने जिंकली. इतकंच नाही तर मनापासून बोलणं, स्वत:साठी उभं राहणं आणि घरात बिनधास्त राहणं यासाठी ती एक आयकॉन ठरली. संपूर्ण गेममध्ये अंकिताने स्पर्धकांसह आणि तिचा पती विकी जैन यांच्यासोबत अनेक चढउतारांचा सामना केला. तथापि, अडथळ्यांचा सामना करूनही स्थिर राहण्याबद्दल अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतले.

‘बिग बॉस 17’ हा शो संपल्यानंतर आणि विजेत्याची घोषणा झाल्यानंतर अंकिता शोच्या सेटवरून बाहेर पडली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अजिबात हसू दिसत नव्हते. तर, यावेळी तिची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिला मीडिया आणि चाहत्यांच्या गर्दीने घेरले होते. मात्र, अंकिता लोखंडे शोमधून बाहेर आली आणि थेट तिच्या कारच्या दिशेने निघून गेली. यावेळी अंकिता लोखंडे हिच्यासोबत तिची आई होती. दोघेही कार जवळ जात असताना मीडियाला टाळताना पाहायला मिळाले आहे. अंकिता लोखंडे हिने यावेळी कोणाच्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

Delivery Boy’च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले, राजेशाही थाटात ‘डोहाळे जेवण’

अंकिता हा खेळ मनापासून खेळली आणि कायम चर्चेत राहिली. ती जिंकली नसली तरी तिच्या फॅन्स आणि चाहत्यांच्या मनात ती कायम घर करून गेली आहे.नुकताच ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. ‘बिग बॉस 17’च्या ‘टॉप 5’ स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे हि ‘टॉप 4’ स्थानावर होती. तर, मुनव्वर आणि अभिषेकसोबत मन्नारा ‘टॉप 3’मध्ये होती. मात्र, ‘टॉप 2’पर्यंत पोहोचल्यावर मन्नारा चोप्रा हिचा प्रवासही संपुष्टात आला.

follow us

वेब स्टोरीज