Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारूकी ठरला बिग बॉसचा महाविजेता!, अभिषेक कुमार राहिना रनर अप

  • Written By: Published:
Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारूकी ठरला बिग बॉसचा महाविजेता!, अभिषेक कुमार राहिना रनर अप

Bigg Boss 17 Winner : बिग बॉस 17 च्या ग्रॅंड फिनालेच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोची गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता होती. अखेर बिग बॉस 17 मध्ये मुनव्वर फारूकीने बाजी मारली. मुनव्वर फारुकी (Munawar faruqui) हा बिग बॉस 17चा महाविजेता ठरला. मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्यात लढत झाली. विशेष म्हणजे, प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा १० मिनिटांसाठी वोटिंग लाईन्स ओपन ठेवण्यता आले. यामध्ये प्रेक्षकांनी मुनव्वर फारुकीला जास्त वोट देत विजेता केलं. सलमान खान (Salman Khan मुनव्वरचा हात वर करून त्याला विजयी घोषित केले.

Horoscope Today: मोठा धनलाभ होण्याची शक्यता; ‘असा’ आहे मिथुन राशीचा आजचा दिवस 

32 वर्षीय मुनव्वर फारुकी हा सुरुवातीपासूनच बिग बॉसमध्ये एक स्ट्रॉंग आणि लोकप्रिय कंटेस्टंट राहिलेला आहे. अंकितासोबतच्या भांडणानंतर मुनव्वरला सोशल मीडियावर खूप पाठिंबा मिळाला. सोशल मीडियावर त्याची प्रचंड क्रेझ होती. इंस्टावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या १०.९ एवढी आहे. कंगणाच्या रियॅलिटी शोमध्येही तो चांगलाच लोकप्रिय झाला होता. याचा परिणाम असा झाला की प्रेक्षकांनी त्याला भरभरून वाट दिले आणि अखेर मुनव्वरने इतिहास रचला. ‘बिग बॉसची ट्रॉफी जिंकणारा तो पहिला स्टँडअप कॉमेडियन ठरला. मुनव्वर फारुकीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी त्याच्या दोन्ही बहिणी सेटवर हजर होत्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मुनव्वरचे चाहतेही भावूक झाले होते.

Horoscope Today: मोठा धनलाभ होण्याची शक्यता; ‘असा’ आहे मिथुन राशीचा आजचा दिवस 

अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण मशेट्टी हे अंतिम फेरीत होते. सर्वात आधी बिग बॉसच्या घरात अरुण मशेट्टीचा प्रवास संपला. त्याच्या पाठोपाठ अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा बाहेर पडले. अखेर मुनव्वर आणि अभिषेक यांच्यात काटे की टक्कर पहायाला मिळाली. मुनव्वरने अभिषेक कुमारचाही पराभव करून विजेतेपद पटकावले. बिग बॉसमधील त्याचा प्रवास खूप संघर्षमय होता. अनेक अडचणींवर मात करत तो फिनालेपर्यंत पोहोचला होता.

प्रेक्षकांचा मिळालेली साथ, चाहत्यांचे प्रेम हे त्याच्यासाठी मोलाचे ठरलं. त्यांच्यामुळं मुनव्वर विजेता ठरला. सलमान खानने मुनव्वरचे अभिनंदन केलं असून त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झालाय. केवळ भारतातच नाही तर जगभरातून चाहते मुनव्वरचे अभिनंदन करत आहेत.

मुनव्वर हा केवळ स्टँडअप कॉमेडियनच नाही तर तो उत्कृष्ट कविताही लिहितो. बिग बॉसमध्येही तो त्याच्या रिलेशनशिपमुळं चर्चेत होता. त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खाननेही बिग बॉसमध्ये भाग घेतला होता.

‘बिग बॉस’ची बक्षीस रक्कम

बिग बॉस 17 च्या विजेत्याला 50 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय एक आलिशान कारही मिळणार आहे. यापूर्वी बिग बॉसची ही रक्कम एक कोटी रुपये होती. मात्र नंतर ती कमी करण्यात आली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज