Salman Khan : ‘ममतांचं घर माझ्या घरापेक्षा’.. सलमान खानच्या खुलाशाने सगळेच अवाक
Salman Khan : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरात 29 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (Kolkata International Film Festival) सुरुवात झाली. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan),महेश भट्ट, अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा असे कलाकार उपस्थित होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली देखील उपस्थित होता. यावेळी सलमान खान याने आपल्या भाषणात ममता बॅनर्जींचे खास कौतुक केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) राज्याच्या मुख्यमंत्री असतानाही त्यांचं घर माझ्या घरापेक्षाही खूप लहान आहे. याचा मला खरंच हेवा वाटतो, असे सलमान खान आपल्या भाषणावेळी म्हणाला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात सलमान पुढे म्हणाला, ज्यावेळी मला दीदींनी त्यांच्या घरी बोलावलं, त्यावेळी माझ्या मनात एकच विचार होता. मला हे पहायचं होतं की खरंच त्यांचं घर माझ्या घरापेक्षा लहान आहे की नाही. आणि घर पाहून मला खरंच त्यांचा हेवा वाटला की त्यांचं घर माझ्या मुंबईतील घरापेक्षा खूप लहान आहे. यानंतर सलमान खाने याने अनिल कपूर यांनी त्यांच्या घरी आपल्याला बोलावल्याची एक आठवण सांगितली.
एकदा शत्रू साहेब (शत्रुघ्न सिन्हा) माझ्या घरी आले होते. यावेळी त्यांना बसायलाही जागा मिळाली नाही. माझ्या घरात एक रुम, एक लहान किचन आणि बेडरूम आहे. हे महत्वाचं आहे कारण मी उभा राहून तर झोपू शकत नाही. आता मला खरंच हेवा वाटतोय की इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचं घर माझ्या घरापेक्षा लहान कसं असू शकतं. यावरून हेच दिसून येतं की लोक किती साधे राहतात. तसं पाहिलं तर आपल्याला जीवन जगण्यासाठी फार गोष्टींची गरजच नाही असेही सलमान खान म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
यानंतर अनिल कपूर यांनीही मनोगत व्यक्त केले. अनिल कपूर (Anil Kapoor) म्हणाले, कोलकाता हे फक्त शहर नाही तर तो एक अनुभव आहे. या शहराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे शहर प्रवास आणि आठवणींचा खजिना आहे ज्याने माझ्या चित्रपटक्षेत्रातील कारकिर्दिला आकार दिला आणि माझे सिनेमाबद्दलचे प्रेम वाढविले. यानंतर अनेक मान्यवरांची भाषणे झाली. राज्याच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.