Mamata Banerjee यांच्या सुरक्षेत मोठी गफलत; बंदूक, चाकू घेऊन इसम थेट निवासस्थानाजवळ
Mamata Banerjee Security : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी गफलत झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या निवासस्थानाजवळ एका संशयित व्यक्तीला पकडण्यात आले आहे. त्याच्याजवळ बंदूक, चाकू अशी हत्यारं आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. ( Intercepted person catch at West Bengal CM Mamata Banerjee residence )
पुण्याचा पठ्ठ्या अजितदादांना नडणार; विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकत थेट खर्गेंना धाडली चिठ्ठी
काय आहे नेमकं प्रकरण?
ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ एका संशयित व्यक्तीला पकडण्यात आले आहे. त्याच्याजवळ बंदूक, चाकू अशी हत्यारं आढळून आले आहेत. हा व्यक्ती निवासस्थानाच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला कोलकाता पोलिसांकडून पकडण्यात आले. तो पोलिसांचं स्टीकर असणाऱ्या गाडीने प्रवास करत होता. या घटनेनंतर पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
West Bengal | Kolkata Police Commissioner Vineet Goyal says, "Kolkata Police has intercepted one person, identified as Sheikh Noor Alam, near CM Mamata Banerjee’s residence while he was trying to enter the lane. One firearm, one knife & contraband substances found on him besides…
— ANI (@ANI) July 21, 2023
अखेर एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन मंजूर; 2021 पासून होते अटकेत
पोलिसांनी सांगितले…
या घटनेबाबत कोलकाता पोलिसांनी माहिती दिली की, या व्यक्तीचं नाव शेख नूर आलम असं आहे. तो मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पकडले असता त्याच्याकडे हत्यारं आढळून आली. त्याच्याकडे चाकू आणि बंदूकसह काही ओळखपत्र ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच त्याच्या गाडीवर देखील पोलिसांचे स्टीकर लावलेले दिसले. त्यामुळे आता या प्रकरणाची गंभीर चौकशी पोलीस, एसटीएफ आणि विशेष तपास शाखा करत आहे.