Salman Khan : ‘Tiger 3’नंतर आता भाईजानचा ‘द बुल’ येणार चाहत्यांच्या भेटीला

Salman Khan : ‘Tiger 3’नंतर आता भाईजानचा ‘द बुल’ येणार चाहत्यांच्या भेटीला

Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजानचा ‘टायगर 3’ (Tiger 3) नंतर आता ‘द बुल’ (The Bull) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. टायगर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) 258 कोटींचा गल्ला कमावला आहे. भाईजानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबर 2023 दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत ‘द बुल’ हा सिनेमा आहे. एका मुलाखतीच्या बोलत असताना सलमान खानने त्याच्या आगामी सिनेमाबद्दल बोलले आहे. या सिनेमात भाईजान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. भाईजानच्या आगामी सिनेमाचं शीर्षक ‘द बुल’ असं असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा आहे.

या सिनेमात भाईजान एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. या सीनसाठी भाईजान आपले केसही कमी करणार आहे. ‘द बुल’ या सिनेमाचे दिग्दर्शन विष्णू वर्धन हे करणार आहेत. हा चित्रपट 2024 च्या ईद दिवशी प्रदर्शित होणार, असं म्हटलं जात आहे. ‘द बुल’ हा ब्रिगेडियर फारूक बुलसाराचा जीवनपट आहे, ज्यांनी 1988 मध्ये मालदीवमध्ये ऑपरेशन कॅक्टसचे नेतृत्व केलं होतं. भाईजान 25 वर्षांनंतर करण जोहरसोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे.

Rakhi Sawant: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचं खरं नाव ठाऊक आहे? पाळण्यात आईने ठेवलेलं भलतंच नाव…

भाईजाननं शेवटी करणसोबत ‘कुछ कुछ होता है’ या सीएनमात काम केले होते. हा सिनेमा 1988 दिवशी प्रदर्शित झाला होता. ‘कुछ कुछ होता है’मध्ये किंग खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या, मात्र सलमान खाननं या सिनेमामध्ये कॅमिओ केला होता. भाईजानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो ‘दबंग’चा आगामी भाग, ‘किक’चा सिक्वेल आणि सूरज बडजात्याचा ‘प्रेम की शादी’ यासह चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सलमान खाननं 24 नोव्हेंबर दिवशी वडील सलीम खान यांचा 88 वा वाढदिवस साजरा केला. तसेच, या खास दिवशी, त्यानं त्याच्या वडिलांसोबतचा एक अप्रतिम फोटो देखील शेअर केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube