Salman Khan: सेमी फायनलचा भाईजानला बसला मोठा धक्का, सलमान खानचे नुकसान

Salman Khan: सेमी फायनलचा भाईजानला बसला मोठा धक्का, सलमान खानचे नुकसान

Tiger 3 IND vs NZ Semi Final : क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा (World Cup 2023 ) पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. (Ind vs NZ) हा सामना भारताने 70 धावांनी जिंकला. (Box Office Collection) मात्र या सामन्याला बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा सलमान खानचे (Salman Khan) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तुफान कमाई करत असल्याचे बघायला मिळाला होता. परंतु, काल (16 नोव्हेंबर) दिवशी क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये परत एकदा रंगल्यामुळे चाहत्यांनी सिनेमागृहाकडे जास्त प्रमाणात वळले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘टायगर 3’ हा सिनेमा रिलीज होऊन 4 दिवस झाले आहेत. चौथ्या दिवशी या सिनेमाने आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे. सिनेमाने जवळपास 20 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रंजक अशा सामनामुळे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ 20 कोटी रुपयांचा गल्ला कमावला केली. भाऊबीज असल्यामुळे या सिनेमाला जास्त कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सामन्यामुळे चाहत्यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली आहे.

Priyanshu Painyuli: प्रियांशुने मेजर राम मेहताच्या पिप्पातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात केलं घर

पहिल्या दिवशी टायगर 3 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 43 कोटी रुपयांची जोरदार कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 58 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तर तिसऱ्या दिवशी 43.50 कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी सिनेमाने 20.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता सिनेमाने एकूण 165 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे.

भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शमीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube