न्यूझीलंडवर हल्ला; शामीवर गुन्हा दाखल? दिल्ली पोलिसांच्या प्रश्नावर मुंबईच्या खाकीचे ‘भन्नाट’ उत्तर

न्यूझीलंडवर हल्ला; शामीवर गुन्हा दाखल? दिल्ली पोलिसांच्या प्रश्नावर मुंबईच्या खाकीचे ‘भन्नाट’ उत्तर

मुंबई : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शमीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ते मोहम्मद शामीने. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर तोच ठरला. शामीने 57 धावा देत तब्बल 7 विकेट्स घेतल्या. त्याच्या याच हल्ल्यामुळे न्यूझीलंडला वर्ल्डकपमधून पॅकअप करावे लागले आहे. (Funny war between Mumbai and Delhi Police after Mohammad Shami’s performance against New Zealand)

दरम्यान, शामीच्या या हल्ल्यानंतर मुंबई आणि दिल्ली पोलिसांमध्ये एक गमतीदार वॉर पाहायला मिळत आहे. कालच्या मॅचनंतर दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना ट्विट करत प्रश्न विचारला की, “आशा आहे, आजच्या हल्ल्यानंतर तुम्ही शामीवर गुन्हा दाखल करणार नाही?” या ट्विटला मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी तेवढ्याच कल्पकतेने प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, “आजिबातच नाही, स्वरक्षणाच्या हक्काअंतर्गत शामी या गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी पात्र ठरला आहे, असा मजेशीर रिप्लाय भारती यांनी दिला. सध्या हे दोन ट्विट चर्चेचा विषय ठरले आहेत.

भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय; विराट, अय्यर, शामी चमकले : आता लक्ष्य फायनलचे

भारताचा शानदार विजय :

कालच्या मॅचमध्ये सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्या ओव्हरपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. दोघांनीही 8 ओव्हर्समध्ये 70 धावा फटकावल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात नवव्या ओव्हरमध्ये रोहित 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि शुभमनने धावफलक हालता ठेवला.

79 धावांववर असताना शुभमन रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर श्रेयस अय्यरला हाताशी धरत विराट आणि श्रेयसने 210 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली 117 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने सुत्र हातात घेतली आणि त्यानेही शानदार शतक झळकावले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही शानदार खेळी केली. 50 ओव्हर्सनंतर भारताने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले होते. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी खराब झाली. शामीनेच या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.

Ind vs NZ : भारताने ‘सबका बदला’ घेतला! 2019 च्या पराभवाचा वचपा काढत फायनलमध्ये एन्ट्री

डेवेन कॉन्वे आणि रचिन रविंद्र हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. मात्र त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डेरेल मिचेल या दोघांनी 180 धावांची भक्कम भागीदारी रचत न्यूझीलंडला मॅचमध्ये जीवंत ठेवले. त्यानंतर शामीनेच धोकादायक बनलेल्या या भागीदारीला फोडत भारताला पुन्हा मॅचमध्ये आणले. त्यानंतर मात्र न्यूझीलंडची टीम सावरु शकली नाही. शामीने दणदणीत सात विकेट्स घेत न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुंग लावला. अन्य बॉलर्स मार खात असताना शामी आणि कुलदीप या दोघांनी चांगली बॉलिंग करत भारताच्या विजयाचा कळस चढविला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube