भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय; विराट, अय्यर, शामी चमकले : आता लक्ष्य फायनलचे

भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय; विराट, अय्यर, शामी चमकले : आता लक्ष्य फायनलचे

मुंबई : भारताने न्यूझीलंडवर (Ind vs NZ) सेमीफायनलमध्ये 70 रन्सने दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आता अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेविरोधात अहमदाबादमध्ये फायनल मॅच खेळणार आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी आणि मोहम्मद शामीच्या सात विकेट्सच्या खेळीवर भारताने विजयी निश्चित केला. (India beat New Zealand by 70 runs in the world cup semi-final)

सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्या ओव्हरपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. दोघांनीही 8 ओव्हर्समध्ये 70 धावा फटकावल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात नवव्या ओव्हरमध्ये रोहित 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि शुभमनने धावफलक हालता ठेवला.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्यात घातपाताच्या धमकीने खळबळ; बंदोबस्तात वाढ

79 धावांववर असताना शुभमन रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर श्रेयस अय्यरला हाताशी धरत विराट आणि श्रेयसने 210 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली 117 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने सुत्र हातात घेतली आणि त्यानेही शानदार शतक झळकावले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही शानदार खेळी केली. 50 ओव्हर्सनंतर भारताने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले होते. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी खराब झाली. शामीनेच या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.

डेवेन कॉन्वे आणि रचिन रविंद्र हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. मात्र त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डेरेल मिचेल या दोघांनी 180 धावांची भक्कम भागीदारी रचत न्यूझीलंडला मॅचमध्ये जीवंत ठेवले. त्यानंतर शामीनेच धोकादायक बनलेल्या या भागीदारीला फोडत भारताला पुन्हा मॅचमध्ये आणले. त्यानंतर मात्र न्यूझीलंडची टीम सावरु शकली नाही. शामीने दणदणीत सात विकेट्स घेत न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुंग लावला. अन्य बॉलर्स मार खात असताना शामी आणि कुलदीप या दोघांनी चांगली बॉलिंग करत भारताच्या विजयाचा कळस चढविला.

‘तो’ तरुण आता ‘विराट’ खेळाडू झाला! ड्रेसिंग रुममधील आठवण सांगत सचिनची भावनिक पोस्ट

कोहलीने सचिनला टाकले मागे :

भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये रनमशीन विराट कोहलीने 50 वे ऐतिहासिक एकदिवसीय शतक झळकावले. या शतकानंतर आता दि ग्रेट सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर ठरला आहे. याशिवाय एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचाच 673 धावांचा विक्रमही विराटने त्याच्या नावावर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube