Ankush Chaudhari : नृत्यातील स्वतःचाच जीवनपट पाहून अंकुशचे डोळे पाणावले

Ankush Chaudhari : मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुश (Ankush Chaudhari) यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुश यांचा सुपरस्टार पदापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या (Superstar Jallosh Juniors) बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला. […]

Ankush Chaudhari अन् निर्माते अभिषेक बोहरा पहिल्यांदाच येणार एकत्र

Ankush Chaudhari

Ankush Chaudhari : मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुश (Ankush Chaudhari) यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुश यांचा सुपरस्टार पदापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या (Superstar Jallosh Juniors) बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला.

खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावूक झाले. प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुश यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा खास परफॉर्मन्स या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळतेय. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि सुपरजज अंकुश चौधरीचा सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स पहाण्यासाठी न चुकता पाहा मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम मिळत आहे. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि सुपरजज अंकुश चौधरीचा सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

Exit mobile version