Download App

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा! हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’.

Announcement of Aali Mothi Shahani : मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत. दमदार कथा, हटके विषय आणि फ्रेश जोड्या यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढत असते. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे.

नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण

नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून या चित्रपटात पहिल्यांदाच हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि सारंग साठ्ये (Sarang Sathye) एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या ताज्या केमिस्ट्रीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

नव्या जोडीला घेऊन

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची (Marathi Movie) जोडी प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले (Entertainment News) यावेळी या नव्या जोडीला घेऊन येत आहेत.

भरभरून प्रेम

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “लवकरच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक चित्रपट (Aali Mothi Shahani) घेऊन येत आहोत. या चित्रपटाची कथा लवकरच समोर येईल, इतकं नक्की की, हृता आणि सारंग यांच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देतील, याची मला खात्री आहे.” फाईन ब्रू प्रॉडक्शन्स प्रस्तुत व ट्रू होप फिल्म वर्क्स यांच्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे.

 

follow us