Hruta Durgule : हृताला करायचाय रणबीर कपूरबरोबर रोमान्स!, म्हणाली…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 14T170800.758

Hruta Durgule On Ranbir Kapoor: ‘फुलपाखरु’,’दुर्वा’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). पहिल्या मालिकेपासून हृताने कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे. हृताने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आज मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. महाराष्ट्राची क्रश अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे ‘सर्किट’ (Circuit) या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आली.

‘सर्किट’ चित्रपटाच्या निमित्ताने हृताने अनेक माध्यमांना मुलाखती देखील दिल्या. या मुलाखतीच्या दरम्यान हृताने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘सर्किट’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादीने एका चॅनेलच्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)


एका मुलाखतीमध्ये वैभवला कोणत्या अभिनेत्रीसोबर तर ऋताला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत रोमान्स करायला आवडणार, असा सवाल करण्यात आला होता. यावर उत्तर देत वैभव म्हणाला, पूजा सावंत आणि मला चाहत्यांनी ऑन स्क्रीन रोमँटिक जोडी म्हणून पसंती दर्शविली. तर माझी आणि प्रार्थना बेहेरेची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)


बॉलिवूडमध्ये कोणत्या अभिनेत्यासोबत सोबत काम करायला आवडणार? असा प्रश्न केल्यावर हृताने “वरुण धवनसोबत काम करायला आवडणार, तर कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत रोमान्स करायला आवडणार? या प्रश्नाचे उत्तर देताना तिने रणबीर कपूरचे (ranbir kapoor) नाव घेतले. यावर हृता म्हणाली, ऑन स्क्रीन रोमान्स याकडे मी कामाच्या दृष्टीकोनातून पाहत आहे. मला रणबीर कपूरसोबत डोळ्यांतून रोमान्स करायला आवडणार असलयाचे सांगितले.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

त्याचे डोळे खूप सुंदर आहेत. शारीरिकपेक्षा मला डोळ्यांतून प्रेम व्यक्त करायला खूप आवडतं. दरम्यान, हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी यांचा ‘सर्किट’ हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. आकाश पेंढारकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून मधूर भांडाकरांची निर्मिती आहे. या चित्रपटामध्ये मिलिंद शिंदे आणि रमेश परदेशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube