Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

Ved Movie On OOT Platform : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख यांचा सुपरहिट मराठी चित्रपट ‘वेड’ आता ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच प्रेक्षकांसाठी वेडच्या निर्मात्यांनी आणखी एक मेजवानी दिली आहे. ती म्हणजे वेड हा चित्रपट आता हिंदीमध्ये देखील पाहता येणार आहे. रोमॅंटिक ड्रामा असेलेल्या वेड चित्रपटाला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रचंड प्रतिसाद दिला. आता ओटीटीवर देखील या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘वेड’ हा अभिनेता रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाखाली बनवलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतात 10 कोटी रुपयांची कमाई केली तर चित्रपटाने मजबूत ओपनिंग वीकेंड कमाई केली होती. जी आता पर्यंतच्या मराठी चित्रपटांपेक्षा जास्त होती. मार्चमध्ये ‘वेड’ ने भारतात 61 कोटी तर जगभरात 73 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे तो 2016 चा ब्लॉकबस्टर ‘सैराट’ नंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.

Sherlyn Chopra : शर्लिन चोप्राला जीवे मारण्याची धमकी; अभिनेत्रीने आरोपीविरोधात दाखल केला गुन्हा

गुरूवारी 13 एप्रिलला हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ‘वेड’ 28 एप्रिलला स्ट्रीम होईल. स्ट्रीमरने घोषणेसह सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर आणि कॅप्शनमध्ये चित्रपटाची टॅग लाईन ही दिली आहे. रितेश आणि जेनेलियाच्या मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ डिज्नी प्लस हॉटस्टारवर मराठीसह हिंदीमध्ये ही दाखवण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube