Ramshej Movie: मराठी सिनेमासृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) यशोगाथा सांगणारे अनेक सिनेमे प्रदर्शित करण्यात आले आहेत. (Ramshej Movie) गेल्या काही वर्षात रिलीज झालेले ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ या सिनेमा (Cinema) मालिकेतील सिनेमांना चाहत्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा नवा सिनेमा चाहत्यांना भेटीला येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ‘रामशेज’ या नव्या मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘मुरारबाजी’ या सिनेमाचे निर्माते ‘रामशेज’ सिनेमाची निर्मिती करणार आहेत. लवकरच या सिनेमाचे शूटिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘रामशेज’ किल्ला नाशिकपासून १६ किलोमीटरच्या अंतरावर आहे, मराठ्यांनी साडेसहा वर्षं मुघलांविरुद्ध हा किल्ला लढवला होता. प्रभू श्रीराम श्रीलंकेला जात असताना त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य असल्याचे सांगितले जाते, तसेच या किल्ल्याचे नाव ‘रामशेज’ असे ठेवण्यात आले अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेप्रमाणे, सिनेमाच्या पोस्टरमध्ये देखील शिवाजी महाराजांचा मावळा आणि त्यामागे प्रभू श्रीरामांची छाया दाखवण्यात आली आहे.
Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई
‘रामशेज’ या सिनेमात अभिनेता अंकित मोहन प्रमुख भूमिका साकारणार आहे, तसेच हरीश दुधाडे, प्राजक्ता गायकवाड यांचा देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. लवकरच सिनेमाचे शूटिंग सुरू होणार आहे, ‘हर हर महादेव’ अशी माहिती अंकित मोहनने पोस्ट शेअर करत दिली आहे. दरम्यान ‘रामशेज’ची घोषणा केल्यावर शिवप्रेमींनी या सिनेमावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.