Download App

Marathi Movie : टर्री चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

  • Written By: Last Updated:

मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आणि गौरी नलावडे यांचा ‘टर्री’ हा चित्रपट 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर आता या चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचं नाव ‘ये ना तू आता’ असं आहे. या गाण्याला प्रफुल्ल स्वप्निल यांनी संगीत दिलं आहे. रोहीत शाम राऊत यांनी हे गाणं गायलं असून गुरू ठाकूर यांनी या गाणं लिहीलं आहे.

या चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने ‘टर्री’ या डॅशिंग चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

‘टर्री’ चित्रपटात संग्राम आणि पै यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. ललित प्रभाकर आणि योगेश डिंबळे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करत प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभी राहत या दोघांनीआपली मैत्री जपली आहे. अचानक या मैत्रीमध्ये वादळ निर्माण होतं याचा सामना हे दोन मित्र कसे करतात? या चित्रपटात पहायला मिळाली आहे. मजा, मस्ती, टशन आणि नात्यामधला ओलावा जपताना ‘टर्री’ कशाप्रकारे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये उभा राहतो ?

Big Boss 16 : असा आहे ‘बिग बॉस 16’ चा रनर अप मराठमोळ्या शिवचा खडतर प्रवास…

‘टर्री’ चित्रपटात ललित प्रभाकर सोबत अभिनेत्री गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर, आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन श्रीराम बडवे, प्रवीण जहागीरदार यांचे आहे. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत.

Tags

follow us