Anupam Kher: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमातून ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर आला आहे. त्याने सिनेमाचे (cinema) जोरदार प्रमोशन देखील केले होते. परंतु बहिष्कारामुळे हा सिनेमा सिनेमागृहातमध्ये उत्तम कामगिरी करू शकला नाही. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवली होती.
सलग सुपरहीट सिनेमा देणाऱ्या आमिर खानच्या या सिनेमाने पहिल्या वीकेंडला ५० कोटींचा गल्ला देखील कमावता आला नाही. यापाठीमागे खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत. त्यापैकी सर्वात पहिली गोष्ट होती ती म्हणजे ‘बॉयकॉट’ ट्रेंड (Boycott trend) हा महत्वाचा मुद्दा होता. आमिर खानच्या या सिनेमाला बॉयकॉट ट्रेंडचा मोठा फटका बसला होता.
या सिनेमातील कलाकारांच्या अगोदरच्या काही चुकीच्या वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे चाहत्यांना या सिनेमाकडे पाठ फिरवली होती. आता खूप दिवसांनी अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा या सिनेमाच्या अपयशावर भाष्य केले आहे. अनुपम खेर म्हणाले की, लाल सिंग चड्ढा हा काही फार उत्तम सिनेमा नाही, जर तो खरंच इतका उत्कृष्ट सिनेमा राहिला असता तर तो कोणत्याही परिस्थितीत तो चाललाच असता.
आमिरचा पिके हा सिनेमा चांगला चालला, हे सत्य तुम्ही स्वीकारायलाच हवं. मी बॉयकॉट ट्रेंडचं अजिबात समर्थन करत नाही, पण आपण कोणाला देखील थांबवू शकत नाही. जर तुमचा सिनेमा चांगला असेल तर तो चाहत्यांपर्यंत पोहोचतो. चांगला सिनेमा करून या बॉयकॉट ट्रेंडवर आपल्याला मात करावी लागते. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती
‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा सुमारे १८० कोटी खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र आमिर खानच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे हा सिनेमा वादात सापडला. याचा परिणाम सिनेमाच्या कलेक्शनवर झाला. या सिनेमाचा भारतातील कलेक्शन १०० कोटींचा आकडा देखील गाठू शकला नाही. या सिनेमाने जवळपास ७० कोटींची कमाई केली होती.