Anushka Sharma : बाईकवर हेल्मेट न घालणं महागात; 4 आकडी रक्कमेत भरावा लागला दंड

Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सध्या जोरदार व्हायरल (video viral) झाला आहे. ज्यामध्ये ती तिचा बॉडीगार्ड सोनूबरोबर मुंबईच्या रस्त्यावर बाईकवर प्रवास करताना दिसून आली होती. या व्हिडीओत दिसत आहे की, अनुष्का आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट घातला नव्हता. यामुळे आता अनुष्काच्या बॉडीगार्डला दंड भारावा लागला आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T111452.835

Anushka Sharma

Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सध्या जोरदार व्हायरल (video viral) झाला आहे. ज्यामध्ये ती तिचा बॉडीगार्ड सोनूबरोबर मुंबईच्या रस्त्यावर बाईकवर प्रवास करताना दिसून आली होती. या व्हिडीओत दिसत आहे की, अनुष्का आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट घातला नव्हता. यामुळे आता अनुष्काच्या बॉडीगार्डला दंड भारावा लागला आहे.

अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी बाईक चालवणाऱ्या सोनू शेखला १० हजार ५०० रुपयांचा ठोठावला आहे. आणि त्याच्याविरुद्ध कलम 129/194, कलम 5/180 आणि कलम 3(1)18 अंतर्गत चलान देखील जारी करण्यात आले आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीटमध्ये अशी माहिती दिली आहे की, सोनू शेखने हा दंड भरला आहे. अनुष्का आणि तिचा बॉडीगार्ड सोनू शेख यांच्या बाईक राइडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल केले होते. सोनू शेख आणि अनुष्का यांनी हेल्मेट घातला नसल्यानं अनेक जण त्यांच्यावर टीका करत होते.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

अनुष्काचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताच, तिच्यावर टिकेची झोड सुरु झाली. अभिनेत्री डबिंग स्टुडिओमध्ये कामासाठी आली होती. परंतु जुहू परिसरात झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. या वेळी अनुष्काने बॉडीगार्ड सोनूची मदत घेत बाईकने प्रवास केला आहे. परंतु तिचा हा व्हिडीओवर व्हायरल होताच, चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Exit mobile version