Download App

खेळाडू रडले अन् विराटची लेक म्हणाली…; टीम इंडियाच्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट

Anushka Sharma हिने खास पोस्ट करत 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं.

Anushka Sharma post for T20 World cup winner Team India : T20 विश्वचषक (T20 World cup ) 2024 चा अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकली आहे. हा सामना भारतीय संघाने (Team India) 7 धावांनी जिंकला. त्यानंतर अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने खास पोस्ट करत अभिनंदन केले आहे. तसेच यामध्ये तिने तिची मुलगी वामिकाने दिलेल्या खास प्रतिक्रियेचा उल्लेख केला.

काय आहे अनुष्का शर्माची खास पोस्ट ?

या पोस्टमध्ये टीम इंडियाचं अभिनंदन करत अनुष्काने लिहिले की, भारतीय संघाने T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना जिंकल्यानंतर खेळाडूंना अश्रु अनावर झाले होते. ते आमची मुलगी वामिकाने टीव्हीवर पाहिले तेव्हा तिने विचारले की, त्या सर्वांना धीर देण्यासाठी मिठी मारण्यासाठी कोणी आहे का? त्यावर मी तिला म्हटलं की, आज तिथे टीम इंडियाला तब्बल 1.5 बिलियन प्रेक्षकांनी मिठी मारली आहे. असं म्हणत अनुष्काने लिहिले की, हा अभूतपूर्व विजय होता. किती महान कामगिरी होती. अशी पोस्ट अनुष्काने केली आहे.

T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली तर अक्षरने तुफान फटकेबाजी करत 31 चेंडूत 47 धावा केल्या. अक्षरने या दरम्यान एक चौकार आणि चार षटकार मारले. याच बरोबर शिवम दुबेने 27 आणि रवींद्र जडेजाने 2 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या 5 धावा करून नाबाद राहिला होता.

स्वित्झर्लंड ते कॅलिफोर्निया Nargis Fakari ची खास ट्रॅव्हल डायरी! पाहा फोटो

177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने आफ्रिकेला मोठा धक्का देत रिझा हेड्रिक्सला बाद केले तर त्यानंतर अर्शदीप सिंगने तिसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार एडन मार्करमला बाद करत आफ्रिकेला या सामन्यात बॅकफूटवर नेले होते. मात्र त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि क्विंटन डी कॉकने आफ्रिकेचा डाव सावरला. ट्रस्टन स्टब्स 21 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला बाद केला. स्टब्सने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. तर डी कॉकने 31 चेंडूत 39 धावा केल्या.

..तर गंभीर परिणामांना तयार राहा, तालिबानची पाकिस्तानला खुली धमकी; नेमकं काय घडलं?

15 व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने 24 धावा दिल्या. येथून भारतीय संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या जवळ घेऊन गेले. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनला बाद करून भारतीय संघाला या सामन्यात कमबॅक करून दिला. हेनरिक क्लासेन 27 चेंडूत 52 धावा केल्या. मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला तब्बल 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकल्यास मदत केली.

follow us

वेब स्टोरीज