Download App

Berlin Film Premiere: अपारशक्ती खुरानाच्या ‘बर्लिन’ची जोरदार चर्चा, IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana) प्रमुख भूमिकेत असलेला ‘बर्लिन’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.

Berlin Film Premiere at IIFM 2024: अपारशक्ती खुरानाचा (Aparshakti Khurana) आगामी चित्रपट ‘बर्लिन’ हा (Berlin Film ) आंतरराष्ट्रीय चित्रपट (International film) महोत्सवांमध्ये चर्चेत असताना ( IIFM 2024) आता या चित्रपटाचा मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 15 व्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियन प्रीमियर (Australian Premiere) होणार आहे. याबाबत इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करून सांगितले आहे.


अभिनेता पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, #बर्लिनचा थरारक प्रवास सुरूच आहे! प्रतिष्ठित @iffmelbourne #IndianFilmFestivalOfMelbourne च्या १५ व्या आवृत्तीत हा चित्रपट ऑस्ट्रेलियन प्रीमियरसाठी सज्ज आहे! ‘बर्लिन’ एका मूकबधिर तरुणाची कथा सांगणार आहे. ज्याला गुप्तहेर म्हणून ब्युरोने अटक केली आहे. एक वेधक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कुतूहलाच्या रोलरकोस्टरवर नेण्याचे वचन देतो. अतुल सभरवाल दिग्दर्शित या चित्रपटात इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी यांच्याही भूमिका आहेत.

‘बर्लिन’ व्यतिरिक्त अपारशक्ती खुराना ‘स्त्री 2’ मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती भूमिका ‘बिट्टू’ पुन्हा साकारताना दिसेल. तो सध्या लंडनमध्ये ‘बदतमीज गिल’साठी शूटिंग करत आहे ज्यामध्ये तो परेश रावल आणि वाणी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. याशिवाय त्यांच्याकडे ‘फाइंडिंग राम’ नावाचा डॉक्युमेंटरीही आहे.

‘आपा फिर मिलांगे’ नंतर Aparshakti Khurana पुन्हा सज्ज; लवकरच येणार नवं गाणं

अतुल सबरवाल दिग्दर्शित आणि लिखित ‘बर्लिन’ चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अपारशक्ती खुरानासोबत इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी हे कलाकार आहेत. ‘बर्लिन’ व्यतिरिक्त, अपारशक्ती ‘स्त्री 2’ मध्येही दिसणार आहे.

follow us