Aparshakti Khurana: अभिनेत्याने परेश रावलसह ‘हेरा फेरी’ सीन केला रेक्रिएट, व्हिडीओ व्हायरल

Aparshakti Khurana: अभिनेत्याने परेश रावलसह ‘हेरा फेरी’ सीन केला रेक्रिएट, व्हिडीओ व्हायरल

Aparshakti Khurana Recreated Hera Pheri Scene : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अपारशक्ती खुराणाने (Aparshakti Khurana) आपल्या प्रेक्षकांना एका आपल्या व्हिडिओद्वारे एक अनोखी मनोरंजनाची झलक दाखवत असतो. ज्यामध्ये तो प्रसिद्ध कॉमिक कॅपर ‘हेरा फेरी’ मधील (Hera Pheri Movie) अभिनेते परेश रावलयाच्या (Paresh Rawal ) बरोबर या सिनेमामधील सीन रेक्रिएट करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी अभिनेते आणि दिग्गज स्टार यांच्यावर जोरदार कंमेंटचा वर्षाव केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana)


अपारशक्ती ‘बदतमीज गिल’ या (Badtameez Gill) आघाडी सिनेमामध्ये परेश रावलबरोबर स्क्रीन शेअर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या दोघे लंडनमध्ये (London) या सिनेमाचे शूटिंग करत असून त्यांनी या व्हिडीओद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर करत असताना एक सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे की, अहो मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी ही खास गोष्ट केली आहे असे लिहून त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अपारशक्तीने जगप्रसिद्ध कॉमेडीस्टार परेश रावल यांच्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओत या दोघांची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षक त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. परेश रावल आणि अपारशक्ती खुराना व्यतिरिक्त ‘बदतमीज गिल’ मध्ये वाणी कपूर देखील झळकणार आहे. या सिनेमाची कथा अद्याप समोर आली नाही आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपा फिर मिलांगे नंतर Aparshakti Khurana पुन्हा सज्ज; लवकरच येणार नवं गाणं

अभिनयाच्या आघाडीवर, अपारशक्ती खुराना या वर्षी रिलीज होणाऱ्या ‘बर्लिन’ मधील पुष्किन वर्माच्या भूमिकेसाठी अनेक सिनेमा महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवत आहे. याव्यतिरिक्त, तो आगामी हॉरर कॉमेडी ‘स्त्री 2’ मध्ये ‘बिट्टू’ ची भूमिका पुन्हा एकदा साकारण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अभिनेत्याकडे ‘फाइंडिंग राम’ नावाची डॉक्युमेंटरीसुद्धा घेऊन येणार आहे. जो ऍप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित आहे. सध्या तो ‘बदतमीज गिल’ साठी शूटिंग करत आहे जिथे तो वाणी कपूर, परेश रावल आणि शीबा चढ्ढा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. असे अनेक चित्रपट त्यांचे यावर्षी रिलीज होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube